पास्ता खायला आवडतो? मग तुमच्या पास्त्याला 'असं' बनवा हेल्दी

जाणून घेऊया हेल्दी पास्ता कसा तयार करता येऊ शकतो.

Updated: Apr 21, 2022, 03:34 PM IST
पास्ता खायला आवडतो? मग तुमच्या पास्त्याला 'असं' बनवा हेल्दी title=

मुंबई : पास्ता खायला कोणाला आवडत नाही. पास्ता खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. शिवाय पास्त्याच्या सेवनामुळे भरपूर पोषण मिळण्यासंही मदत होते. परंतु यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याच कारण म्हणजे यात भरपूर कार्ब आहेत. ज्यामुळे वजन वाढू शकतx आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्या उद्भवू शकतात. 

दररोज रिफाइंड पास्ता खाल्ल्याने तुम्हाला डायबेटीजचा होऊ शकतो. त्यामुळे रिफाइंड पास्ता खाण्याऐवजी गहू किंवा रव्यापासून बनवलेला पास्ता खावा. यामुळे तुमच्या खूप फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया हेल्दी पास्ता कसा तयार करता येऊ शकतो.

हेल्दी पास्ता कसा कराल?

हेल्दी पास्ता बनवण्यासाठी तुम्ही मैदाच्या जागी रवा किंवा गहूच्या पास्त्याचा वापर करा. यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या आणि सोयाबीन घालू शकता. सॉससाठी तुम्ही व्हाईट किंवा रेड दोन्हीचा वापर करू शकता. हे बनवण्यासाठी फार सोप्पं असून तुम्ही तुमच्या हिशोबाने पोषक तत्त्वांचा वापर करू शकता.

मैदाचा पास्ता खाण्याने होणारं नुकसान

  • मधुमेहाचा धोका वाढतो
  • पोषक तत्वांची कमी
  • हृदयाच्या रूग्णांनी हानिकारक
  • हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते
  • वजन वाढण्याची शक्यता