दररोज 15 मिनिटे करा जपानी एक्सरसाइज, पोट-कंबरेची चरबी 1 महिन्यात वितळेल

Weight Loss Excercise : पोटाची हट्टी चरबी कमी करण्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते. अशावेळी जपानी एक्सरसाइज ठरते अतिशय फायदेशीर. या गोष्टींचा करा फिटनेसमध्ये समावेश. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 4, 2023, 12:37 PM IST
दररोज 15 मिनिटे करा जपानी एक्सरसाइज, पोट-कंबरेची चरबी 1 महिन्यात वितळेल title=

Japan Excercise And Fitness : प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजवर अवलंबून असतात. अतिशय कठिण एक्सरसाइज करूनही चांगला रिझल्ट मिळत नाही तेव्हा खूप त्रास होतो. पण काही असे व्यायाम प्रकार आहेत ज्यामुळे जबरदस्त फायदा मिळतो. 

हेल्दी आणि फिट राहण्याची चर्चा गोते तेव्हा जपानी टिप्स टॉपवर असतात. जपानी लोक आपल्या फिटनेस आणि हेल्दी शरीराकरता अतिशय प्रसिद्ध आहे. अनेकदा व्यायाम करताना आपल्या शरीराची ताकद आणि कमकुवत बाजू अशा दोन्ही समजून घेणे गरजेचे आहे. वजन कंट्रोल करत असताना सगळ्या गोष्टी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या डाएट ते अगदी एक्सरसाइजपर्यंत अतिशय हेल्दी रुटीन फॉलो करत असतात. प्रत्येकाने आपल्या रुटीनमध्ये खालील टिप्सचा समावेश करावा. 

रोल-अप 

जपानी पद्धतीचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला चटईवर झोपावे लागेल. दोन्ही हातांना डोक्यावर लॉक करा आणि हळू हळू सिट अप्स करा. पाठीला वर उचलण्यासाठी रोल केलेल्या टॉवेलची मदत घेऊ शकता. सिट-अप्स कोर मजबूत करतात. यामुळे फ्लेक्सिबिलिटी आणि परफॉर्मन्स वाढण्यास मदत होते. 

लंजेस टो टच  

लंजेस टो टच या एक्सरसाइजमध्ये पोटाची चरबी कमी करणाऱ्या मसल्सला टारगेट केलं जातं. हे एक फूल बॉडी जपानी एक्सरसाइज आहे ज्यामध्ये हेमस्ट्रिंगला स्ट्रेच आणि हिप्स जॉइ्ट्स फ्लेसिबिलिटी वाढण्यास मदत होते.   

टॉवल स्विंग 

हा अतिशय सोपा आणि सहज केला जाणारा जपानी व्यायाम प्रकार आहे. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते. आयडियल एक्सरसाइज आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. 

रिवर्स क्रंचेस 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस सर्वात जास्त प्रभावी असतात. रिवर्स क्रंचेस एक इंटेस वर्कआऊट आहे ज्यामध्ये मसल्स चांगले होण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला सिक्स पॅक एब्स हवे असतील तर ही अतिशय परफेक्ट एक्सरसाइज आहे. 

बॉल ट्विस्ट 

जपानी एक्सराइज बॅलेंस आणि अतिशय फ्लेक्सिबल आहे. यामुळे ताकद वाढते. मसल्स वाढवण्यासाठी मदत होते. एक्सरसाइजनंतर तुम्ही सरळ झोपून जा. यामुळे अतिशय चांगला आराम मिळेल.