Home Remedies on Low BP : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईतील हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. तब्बल 5 वर्षांनंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी मृत्यूचे कारण उघड केले.
श्रीदेवी शरीराची अत्यंत काळजी घेत असे. कायम चांगली दिसण्यासाठी श्रीदेवी डाएट फॉलो करत असे. हा अतिशय स्ट्रिक्ट डाएट असे. अनेकदा श्रीदेवी डाएटकरिता उपाशी देखील राहत असे. या दरम्यानच श्रीदेवीला Low BP चा त्रास देखील सुरू झाला होता. डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक भोवळ येणे यासारख्या समस्या जाणवत असे. अचानक Low BP झाल्यावर 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. Mayo Clinic च्या रिपोर्टनुसार, अशावेळी काय घरगुती उपाय कराल हे समजून घेणे गरजेचे आहे.
कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आपल्या डाएटची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या लोकांनी उपवास करणे सहसा टाळावे अन्यथा फार काळ उपाशी राहू नये. लो बीपी सांभाळणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जसे की, केळ, मखाना, पपई, मुळा, पालक यासारखे पदार्थ खावेत.
अति मीठ शरीरासाठी घातक असले तरीही लो बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने मीठाचा समावेश आहारात आवर्जून करावा. व्यायाम करताना एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.
कोमट पाण्याने देखील लो बीपीचा त्रास कमी होतो. त्यामुळे थोडा थकवा जाणवला तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी आरोग्यासाठी देखील चांगले असते.
अचानक शरीरातील रक्तदाब कमी झाला तर गरम दूध देखील याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. लो बीपीचा त्रास जाणवलास गरम दूध प्यावे. गरम पाणी आणि गरम दूध शरीरासाठी चांगलेच असते.