कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागणार? मोदींचे संकेत

कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.

Updated: May 12, 2020, 11:30 PM IST
कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागणार? मोदींचे संकेत title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन 4.0चे संकेत दिले. यादरम्यान मोदींनी दोन प्रमुख नियमांचा उल्लेख केला आहे, ज्यासोबत आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार आहे. पहिलं, मास्क लावणं बंधनकारक असणार आणि दुसरं, दोन गज की दूरी अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. परंतु हे दोन नियम हेदेखील सूचित करतात की सध्या कोरोना विषाणूची लस तयार होण्यास अवधी लागू शकतो. मोदींनी जनतेशी संवाद साधताना, सांगितलं की, जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना दीर्घकाळ राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहून, सर्व नियमांचं पालन करत कोरोनापासून वाचायचं आहे आणि पुढे जायचं आहे. 

देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोदींकडून २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

जगभरातील संशोधकांकडून गेल्या पाच महिन्यांपासून अनेक प्रयत्नांनंतरही कोरोना व्हायरसवरील लस, औषध तयार करण्यात आली नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील इतर संशोधकांनीही येणाऱ्या काही दिवसांत कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवय करावी लागेल याबाबत सांगितलं होतं. एड्स, डेंग्यू यांसारख्या आजारांवरही अद्याप कोणताही ठोस इलाज नाही. कोरोना व्हायरसही त्याचप्रमाणे असू शकत असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवयच करावी लागेल, असं ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक डॉक्टर आणि संशोधकांनी येणाऱ्या काळात कोरोनावरील लस तयार करण्यास आणखी काही अवधी लागू शकत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं, सध्या हाच एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आतातरी लॉकडाऊन संपणार का; वाचा मोदी काय म्हणाले?

कोरोनाबाबत संशोधकांचा नवा निष्कर्ष; औषध सापडेपर्यंत 'हा' एकमेव पर्याय