पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय Infertility चं प्रमाण, कोणती लक्षणं धोक्याची?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांमध्ये इन्फर्टिलीटीची काही लक्षणं असतात, ज्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीही करू नये.

Updated: Mar 6, 2022, 03:19 PM IST
पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय Infertility चं प्रमाण, कोणती लक्षणं धोक्याची? title=

मुंबई : गर्भधारणेमध्ये यश मिळत नसेल तर पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या असण्याची शक्यता असू शकते. कारण मूल न होण्याच्या 50 टक्के प्रकरणांमध्ये पुरुषांमध्ये असलेल्या इन्फर्टिलीचं प्रमाण दिसून येतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांमध्ये इन्फर्टिलीटीची काही लक्षणं असतात, ज्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीही करू नये.

पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची लक्षणं

पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात. जाणून घ्या यासंदर्भातील लक्षणं-

  • अंडकोषभोवती वेदना किंवा सूज येणं
  • पुरुषांच्या स्तनांमध्ये असामान्य बदल होणं
  • सतत रेस्पिरेटरी इंफेक्शन होणं
  • चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील केसांमध्ये घट होणं
  • स्पर्म काऊंट कमी होणं

पुरुषांमध्ये इन्फर्टिलीटी होण्याची कारणं

  • कमी स्पर्मचं प्रोडक्शन
  • धुम्रपानासारखी वाईट सवयी
  • स्पर्मच्या नलीकेत अडथळा
  • दीर्घकालीन आजार