दृष्टी कमजोर आणि मोतीबिंदूच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात या गोष्टीचा करा समावेश

डोळ्यांची समस्या नकोय तर आहारात आताच ही भाजी घेण्यास सुरुवात करा.

Updated: Sep 7, 2022, 11:29 PM IST
दृष्टी कमजोर आणि मोतीबिंदूच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात या गोष्टीचा करा समावेश title=

मुंबई : शिमला मिरची सर्वांना माहित आहे. अनेक जण ती खात देखील असतील. पण तिचे फायदे खूप कमी लोकांना माहित असतील. मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या समस्या टाळण्यासाठी (Capsicum) खूप खास आहे. सिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही दोन नैसर्गिक संयुगे असतात जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात. ही दोन्ही संयुगे उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट्स आहेत आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत पण दुर्दैवाने ती आपल्या शरीरात तयार होत नाहीत.

सिमला मिरची व्यतिरिक्त, इतर अनेक फळे आणि भाज्या आहेत ज्यामध्ये हे दोन्ही अँटिऑक्सिडेंट आढळतात. पण, सिमला मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी आणि हलके असते तसेच अनेक जीवनसत्त्वांनी समृद्ध असते आणि मुख्य म्हणजे मधुमेही देखील ते आवडीने खाऊ शकतात. या डोळ्यांच्या समस्यांचे (मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन) मुख्य कारणांपैकी एक मधुमेह असल्याने, सिमला मिरची हा एक उत्तम पर्याय आहे.

तसेच आठवड्यातून 2-3 वेळा सिमला मिरची खा, तुम्ही ते कोणत्याही प्रकारे खाऊ शकता, जसे की भाजी बनवून, सॅलड म्हणून. तुम्ही हिरवी किंवा लाल किंवा पिवळी शिमला मिरची, जे तुम्हाला सहज मिळेल ते खाऊ शकता. तुम्ही अनेक प्रकारे त्याचं सेवन करु शकतात.