आहारात 'राई'च्या तेलाचा वापर करण्यापूर्वी जाणून घ्या हा गंभीर धोका

 न्युयॉर्क - आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सार्‍यांचेच जीवन तणावग्रस्त झाले आहे. त्यातून काही आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे डाएट, व्यायाम  याद्वारा आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 10, 2017, 10:03 PM IST
आहारात 'राई'च्या तेलाचा वापर करण्यापूर्वी जाणून घ्या हा गंभीर धोका  title=

 न्युयॉर्क - आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सार्‍यांचेच जीवन तणावग्रस्त झाले आहे. त्यातून काही आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे डाएट, व्यायाम  याद्वारा आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. 
 
 डाएटचा विचार केला की खाद्यतेलाची योग्य निवड गरजेची आहे. खाद्य तेलाची निवड करण्यापूर्वी संशोधकांनी समोर आणलेला हा अहावाल नक्की वाचायला हवाच. 

 
 राईचं तेल - 

 
 भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये राईचं तेल अनेक प्रांतांमध्ये वापरलं जातं. संशोधकाच्या अभ्यासानुसार रोज दोन चमचे राईचे तेल आहारात आल्यास तुमच्या आकलनक्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. 

 

काय आहे धोका 

 

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, अल्झायमरग्रस्त लोकांमध्ये या तेलामुळे वजन वाढण्याचा धोका बळावतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, व्हेजिटेबल ऑईलचा अधिक वापर केल्यास मेंदूवर परिणाम होतो. 

राईचं तेल आरोग्यवर्धक आहे. मात्र सामान्य तेलापेक्षा राईच्या तेलाचे जेवण दिलेल्या उंदराचे वजन वाढते. 

 संशोधकांचा निष्कर्ष काय ? 

 
 संशोधकाच्या दाव्यानुसर सलग सहा महिने राईचं तेल आहारात असल्यास तुमच्या स्मरणशक्तीवर तसेच आकलन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.  
 
 अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया मधील टेंपल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डोमेनिको प्रेटिको यांच्या म्हणण्यानुसार राईचं तेल एक व्हेजिटेबल तेल आहे. तरीही त्याचा वापर प्रमाणात करणं आवश्यक आहे.