मुंबई : जगभरात दिवसेंदिवस रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी कमी-जास्त असेल, तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे, हे वेळीच ओळखायला हवे.
रक्तदाबाचे हे एक महत्त्वाचे लक्षण लक्षात ठेवा. डोक्याच्या मागच्या बाजूला दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
तुम्हाला विनाकारण खूप ताण आल्यासारखं जाणवलं, तर नजर ठेवा, कारण हे देखील रक्तदाब वाढीचं महत्वाचं कारण आहे. ते वेळीच ओळखा.
तुम्हाला दीर्घकाळ चक्कर आल्यासारखे होत आहे का, तर या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडेसे काम केल्यावर तुम्हाला खूप जास्त थकवा आला आहे, असं वाटतं का?, तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असू शकतो.
श्वास घेण्यामध्ये अडचण येत असतील तरीही तुम्हाला रक्तदाब असण्याची शक्यता असते. शिवाय नाकातून रक्त येणे ही पण उच्च रक्तदाबाची समस्या आहे.
तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाबाची तपासणी करुन घेणे सोयीचे ठरते. कारण निद्रानाश हेही रक्तदाबाचेच एक लक्षण आहे.