तुम्ही देखील कलिंगड खाताना अशा गोष्टी करताय? मग तुम्ही खुप मोठी चूक करताय

आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत, जे कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु ते चुकीचे आहे.

Updated: Jun 6, 2022, 06:33 PM IST
तुम्ही देखील कलिंगड खाताना अशा गोष्टी करताय? मग तुम्ही खुप मोठी चूक करताय title=

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोकं वेगवेगळ्या पर्यायांकडे वळतात. जसे की, जास्त पाणी पिणे, रसाळ फळं खाणे, आहाराचं संतुलन राखने. बरेच लोक उन्हाळ्यात कलिंगड खातात. कारण कलिंगड हे चवीला देखील असतं, तसंच ते रसाळ असल्यामुळे शरीराला पाणी देखील मिळतं. तसेच कलिंगडमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अ, ब 6 आणि क जीवनसत्व असतं. शरीरातील रक्त वाढवण्यास फायदेशीर असलेलं लायकोपिन देखील कलिंगडमध्ये जास्त असतं. 

परंतु आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत, जे कलिंगड कापून फ्रीजमध्ये ठेवतात. असं करण्यामागे बऱ्याच लोकांचा विचार असतो की, ते असे केल्याने पुढच्यावेळी ते खाण्यासाठी सोपं होईल. परंतु असं केल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं.

कलिंगड जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाल्लात तर यामुळे शरीराला फायद्याऐवजी नुकसानच होईल. त्यामुळे कलिंगड खाताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

कलिंगड फ्रिजमध्ये का ठेवू नये?

1. कलिंगड चिरुन फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील अति थंडं तापमानामुळे कलिंगडातील लायकोपिन, सिट्रोलिन, अ आणि क जीवनसत्वाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कलिंगड खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. 

2. कलिंगड चिरुन फ्रिजमध्ये ठेवल्यास कलिंगडातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे कलिंगडच्या फायद्या ऐवजी नुकसानच होईल. फ्रिजमध्ये ठेवलेलं असं दूषित कलिंगड खाल्ल्यानं अन्नाची विषबाधा होण्याचा धोका असतो. म्हणून कलिंगड चिरल्यानंतर ते ताजंच खायला हवं. 

3. फ्रिजमध्ये ठेवलेलं कापलेलं कलिंगड खाल्ल्यास सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. 

4. फ्रिजमध्ये कलिंगड कापून ठेवल्यास कलिंगडावरील दूषित घटक आतड्यांवर गंभीर परिणाम करतात. दूषित कलिंगड खाल्ल्यानं पचनाच्या आणि पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.