महिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं

बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही.

Updated: Jun 6, 2022, 06:32 PM IST
महिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं title=

मुंबई : महिलांना बऱ्याचदा पोटदुखीची समस्या उद्भवते. ओटीपोटात दुखण्याने महिलांना खूप त्रास होतो. यावेळेस बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही. तर यामागे अनेक कारणं असू शकतात. जी बऱ्याच लोकांना माहित नसतात. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे महिलांच्या मासिक पाळी व्यतिरीक्त पोटात दुखते.

बर्‍याच वेळा स्त्रियांना ओव्हेरियन सिस्ट प्रॉबलममुळे पोट फुगणे, अनियमित मासिक पाळी न येणे, ओटीपोटात दुखणे अशा समस्या उद्भवतात.

खरं तर, महिलांच्या अंडाशयातील ओवेरियन सिस्ट पिशवी फुटल्यामुळे देखील अशा समस्या उद्भवू शकतात आणि हे खूप गंभीर आहे. त्यामुळे घरी काहीही उपचार न करता आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

खरंतर ओवेरियन सिस्ट ही एक तरळ पदार्थांची पिशवी आहे. जी महिलांच्या अंडाशयांमध्ये असते. यामुळे यूटीआयमध्ये मूत्रपिंड, गर्भाशय, मूत्राशय, मूत्रमार्गाचा संसर्ग होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येमध्ये महिलांच्या खालच्या ओटीपोटात दुखू शकते.

याशिवाय, गर्भपातामुळे देखील पोटा दुखू शकतात. यामुळे पोटाच्या खालच्या भागात दुखणे, खूप रक्तस्राव होणे, पाठदुखी, ताप, पेटके इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)