मुंबई : नात्यामध्ये पार्टनरच्या चांगल्या सवयींसोबत वाईट सवयींचाही स्वीकार करणे गरजेचे आहे. एका चांगल्या नात्यासाठी असे करणे आवश्यकही आहे. तर अनेकदा नाते टिकवण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याचा भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. गर्लफ्रेंडमध्ये हे ५ गुण असल्यास तुम्हाला नात्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा....
काही मुलींना छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करुन सांगण्याची सवय असते. किंवा अनेकदा त्या खोटं बोलतात. अशा मुली प्रेमात धोका देऊ शकतात.
लहान सहान गोष्टींवरुन जर तुमच्या गर्लफ्रेंडला टोमणे मारण्याची सवय असेल तर तुम्हाला नात्याचा पुन्हा विचार करायला हवा. कारण तिचे सतत असे वागणे तुमच्या आत्मसम्मानाला ठेस पोहचवतात.
आपल्या पार्टनरची तुलना इतर मुलांनी करणे अत्यंत चूकीचे आहे आणि अनेक मुलींना अशी सवय असते. त्यामुळे पार्टनरचा आत्मविश्वास कमी होतो. अशा मुली तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जावू देणार नाहीत.
गर्लफ्रेंड असो किंवा पत्नी काही मुलींना प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय असते. आणि नात्यात तीच गोष्ट सर्वात आधी खटकते. याचा अतिरेक मुलांमध्ये चीड निर्माण होते.
प्रत्येक गोष्टीसाठी बॉयफ्रेंडला खर्च करायला लावणारी मुलगी भविष्यात आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहण्याची शक्यता खूप कमी असते. अशा मुली संधी साधून धोका देऊ शकतात.