आईसक्रीम खाताय सावधान, तुमच्या आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्स?

आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्सचा वापर केला जातो. या फॅट्समुळे आईस्क्रीमचा रंग आणि चवीमध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. मात्र अशी आईस्क्रीम खाल्ल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं

Updated: Mar 29, 2023, 10:59 PM IST
आईसक्रीम खाताय सावधान, तुमच्या आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्स? title=

 उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते आईस्क्रीम खाण्याचे, बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या आईस्क्रीम उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या फ्लेव्हरची आईस्क्रीम खाण्याकडे सर्वांचाच कल असतो. मात्र याच आईस्क्रीमबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे केले जातायेत. आईस्क्रीममध्ये पामोलीन तेलापासून तयार झालेले वनस्पती फॅट मिसळले जातात असे व्हिडिओ व्हायरल होतायेत. हे फॅट मिसळून तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय असाही दावा करण्यात येतोय. व्हायरल व्हिडिओजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहूयात

काय आहे व्हायरल मेसेज?

आईसक्रीममध्ये वनस्पती फॅट्सचा वापर केला जातो. या फॅट्समुळे आईस्क्रीमचा रंग आणि चवीमध्ये कुठलाही फरक जाणवत नाही. मात्र अशी आईस्क्रीम खाल्ल्यानं तुमचं आरोग्य बिघडू शकतं. 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच जण आईस्क्रीम खातात. हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यानं आम्ही याबाबत पडताळणी केली. आमचे प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिका-यांना भेटले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हीच पाहा

नेमकं काय सत्य?

आईस्क्रीममध्ये वनस्पती तेल वापरण्यास परवानगी नाही. मात्र फ्रोजन डेझर्टमध्ये वनस्पती तेल वापरता येतं. त्यामुळे आईस्क्रीमध्ये वनस्पती तेल वापरण्यात येत असल्याच्या दाव्यात तथ्य नाही. आईस्क्रीम घेताना त्यातील कंटेट पाहूनच खरेदी करा. 

केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच अशा  प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जातात. त्यामुळे आईस्क्रीममध्ये वनस्पती फॅट्स वापरले जातात हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.