थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी

थंडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.   

Updated: Jan 1, 2021, 12:48 PM IST
थंडीत अशी घ्या त्वचेची काळजी title=

मुंबई : थंडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्वचेची कळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. थंडीच्या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची कशी काळजी घ्याल, याविषयी महत्त्वाचे मुद्दे...

त्वचेची काळजी

- घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. 

- आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रिमऐवजी करावा.

- हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. 

- पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. 

- त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. 

- रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.