होळीसाठी खास बनवा थंडाई

होळीच्या सणामध्ये बऱ्याच ठिकाणी थंडाई बनवली जाते. उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी होळीच्या सणाला थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईचे शरीरालाही अनेक फायदे होतात. थंडाईमुळे अॅसिडिटी, पोटातील जळजळ, अपचनसारख्या समस्या दूर होतात. जाणून घ्या कशी बनवतात थंडाई

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Mar 1, 2018, 02:14 PM IST
होळीसाठी खास बनवा थंडाई title=

मुंबई : होळीच्या सणामध्ये बऱ्याच ठिकाणी थंडाई बनवली जाते. उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणी होळीच्या सणाला थंडाई पिण्याची प्रथा आहे. थंडाईचे शरीरालाही अनेक फायदे होतात. थंडाईमुळे अॅसिडिटी, पोटातील जळजळ, अपचनसारख्या समस्या दूर होतात. जाणून घ्या कशी बनवतात थंडाई

साहित्य : 
साखर - ४-५ मोठे चमचे
पाणी - दीड कप
बदाम - बारीक कापलेले
गुलाब जल आणि गुलाबाच्या पाकळ्या
बडिशेप
काळी मिरी
टरबुजाच्या बिया
छोटी वेलची
दूध १ लीटर

कृती : वेलची सोलून दाणे वेगळे करा. यानंतर खसखस थोडासा भाजून घ्या. खसखस भाजल्याने तो वाटणे सोपे जाते. मिक्सरमध्ये बदाम, बडिशेप, खसखस, मिरीचे दाणे, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलचीचे दाणे एकत्र वाटून घ्या. याची पावडर तयारी होईल. दूध उकळून घ्या. त्यानंतर यात ही पावडर मिसळून अर्धा तास ठेवा. यानंतर दूध फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना गुलाब जल अथवा गुलाबाच्या सुक्या पाकळ्यांनी सजवा.