मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे, लाईफस्टाईलमध्ये होणार्या बदलांचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलल्याने आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. यामुळेच बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्याचे दिसऊन आले आहे. वेळीच बद्धकोष्ठतेवर योग्य उपचार न केल्यास त्यामधून मूळव्याधीसारखे अनेक त्रासदायक आजार बळावण्याची शक्यता वाढते.
बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी औषधोपचारांप्रमाणेच व्यायाम आणि आहारात केलेले बदल फायदेशीर ठरतात. याकरिता भात, बटाटा, संत्र, मोसंबी,गाजर, केळं, द्राक्ष, सफरचंद, पपई, आवळा अशा घटकांचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत होते. पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय
मऊसर भाताच्या मदतीने शरीरातील युरीक अॅसिड आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. भाताच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पचनसंस्था अधिक सक्षम होते. त्यामुळे नियमित किमान मूठभर भात खाणं फायदेशीर आहे. 'हे' आहेत दही भात खाण्याचे फायदे!
बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फरसबीचा आहारात समावेश करावा. यामुळे आतड्याचे कार्य सुधारते. फरसबीमुळे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होतो.
बटाट्यामधील फायबर घटक पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही आटोक्यात राहण्यास मदत होते. बटाट्यापासून अनेक चटकदार पदार्थ बनवले जाऊ शकतात. त्यामुळे आहारात बटाट्याचा अधिक वेगवेगळ्या स्वरूपात समावेश केला जाऊ शकतो. बटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...
भोपळ्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामध्ये फायबर आणि पाण्याचा अंश मुबलक असतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.