मुंबई : मूळव्याधीचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. या आजाराबाबत मोकळेपणाने बोलणं टाळलं जातं. त्यामुळे अनेकजण हा त्रास सहन करत राहतात. जेव्हा हा त्रास गंभीर स्वरूप धारण करतो तेव्हा शस्त्रक्रियेसारखे पर्याय निवडावे लागतात. म्हणूनच या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूळव्याधीच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
मूळवाधीचा त्रास होत असल्यास वेदना जाणवणं, खाज येणं हा त्रास नियमित जाणवतो. त्यामुळे तुम्हांला इतर कोणत्याच कामात नीट लक्ष देता येत नाही. मग पहा या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नेमके घरगुती उपाय काय? मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती
बर्फ - वेदना, सूज, खाज येणं हा त्रास मूळव्याधीच्या समस्येमध्ये जाणवत असल्यास बर्फाचा वापर करा. बर्फाचा हलका मसाज तुमचा त्रास कमी करू शकतो.
कोरफडीचा गर - मूळव्याधीच्या त्रासामध्ये रक्त पडण्याचा त्रास असल्यास, सतत खाज येत असल्यास त्या जागी कोरफडीचा गर लावा. कोरफडीचा गर फ्रीजमध्ये ठेवून नंतर लावल्यास अधिक परिणामकारक ठरतो. मूळव्याधीचा त्रास 7 दिवसात दूर करणारे घरगुती मलम
मेहंदीची पानं - मेहंदीची पानं पाण्यासोबत वाटा. हे मिश्रण त्रास होणार्या जागी लावल्यास आराम मिळतो. खाज, जळजळ कमी करण्यासाठी मेहंदीचा थंडगार गुणधर्म फायदेशीर ठरतो.
आवळा - मूळव्याधीच्या समस्येवर आवळा फायदेशीर आहे. चमचाभर आवळ्याचे चूर्ण नियमित मधासोबत घेतल्यास फायदा होतो. सूज कमी करण्यासही मदत होते. मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर फायदेशीर 'हा' घरगुती उपाय