मुंबई : 'हम साथ साथ है' ,'सरफरोश' अशा सिनेमांमधून आजही रसिकांच्या मनात आजही आपलं अढळ स्थान बनवणार्या सोनाली बेंद्रेने 4 जुलैला सोशल मीडियावर ती कॅन्सरशी सामना करत असल्याची पोस्ट शेअर केली. कॅन्सरशी निर्धाराने सामना करणार्या सोनाली बेंद्रेने चाह्त्यांसोबत एक हळवी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सोनाली High Grade, metastatic cancer कॅन्सरशी सामना करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पहा कॅन्सरशी सामना करत असलेली सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर काय म्हणाली
कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेत असलेल्या सोनाली बेंद्रेला असणारा कॅन्सर नेमका कोणता आहे? त्याचं स्वरूप किती गंभीर आहे याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या दुर्धर आजारातून सोनाली लवकर बाहेर पडावी अशी सारेच प्रार्थना करत आहे. मग तुमच्या मनात असलेल्या याच प्रश्नाचं हे उत्तर... सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?
कॅन्सर सर्जनच्या सल्ल्यानुसार, कॅन्सर एका शरीरात एका अवयवामधून सुरू होतो. कॅन्सर सेल्सची जशी वाढ होण्यास सुरूवात होते, तसा तो इतर अवयवांमध्येही पसरत जातो. यालाच metastasis म्हणतात.
समजा रूग्णामध्ये किडनीचा कॅन्सर असेल तर तो फुफ्फुसांमध्येही पसरू शकतो. याचा अर्थ असा नाही रूग्णाला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. किडनीचा कॅन्सरच फुफ्फुसातही वाढत असतो.
Metastatic Cancer हा प्रामुख्याने स्टेज IV कॅन्सर असतो. अशा कॅन्सरमध्ये कॅन्सर कशामुळे झालाय यावर उपचारापेक्षा रूग्णाला अधिक जास्त काळ उत्तम स्थितीमध्ये जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. High Grade Cancer चा सामना करणार्यांचा आहार कसा असावा?
Metastatic Cancerमध्ये ट्युमर एकाच ठिकाणी नसल्याने शस्त्रक्रिया फारशी मदत करू शकत नाही. मात्र रूग्णाच्या परिस्थितीनुसार, सर्जरीच्या सोबतीने केमोथेरपी, रेडिएशन यांची मदत घेतली जाऊ शकते.
प्रामुख्याने Metastatic Cancerमध्ये कॅन्सरची वाढ रोखणं आणि रूग्णाला अधिक काळ चांगल्या स्थितीमध्ये जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. सावधान ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका