Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम

Blood Pressure Control : कोणत्याही कारणाशिवाय चक्कार येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारखे लक्षणे दिसून आली तर वेळीच सावध व्हा. कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात. जर तुम्हाला पण कमी रक्तदाबाचा असेल तर जाणून घ्या त्यावरील सोपे उपाय...

श्वेता चव्हाण | Updated: May 16, 2023, 03:16 PM IST
Low Blood Pressure : तुमचाही ब्लड प्रेशर लो होतोय का? मग फॉलो करा 'या' टिप्स, लगेच मिळेल आराम title=
Blood Pressure Control

Low Blood Pressure In Marathi : अनेकांच्या बैठी जीवनशैलीमुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. कमी रक्तदाब (Low BP) ही देखील मोठी समस्या आहे. वाढत्या वयाबरोबरच रक्ताभिसरण योग्य नसल्यामुळे बहुतेक लोक कमी रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे डोळ्यांसमोर अंधार येणे, हाता-पायांना घाम येणे, चक्कर येणे या समस्या सामान्य आहे. 

पण या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या सर्व गोष्टींमुळे शरीरात रक्तपुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब (Low Blood Pressure) असाधारणपणे कमी झाला की रक्तदाब कमी चा त्रास जाणवतो. याला कमी रक्तदाब, अल्प रक्तदाब, हायपोटेन्शन किंवा कमी बीपी असेही म्हणतात. कमी रक्तदाब होणे ही हाय ब्लडप्रेश इतकीच गंभीर समस्या ठरु शकते त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. जर तुमचाही ब्लड प्रेशर लो असेल तर त्याची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या...

रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण म्हणजे 120/80 आहे आणि जर रक्तदाब हा 90/60 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. रक्तदाब कमी झाल्यास मेंदू आणि इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे उद्भवतात. 

कमी रक्तदाबाची लक्षणे

  • कमी रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये अंधुक दिसणे, अस्वस्थ वाटणे, नैराश्य, थंडी वाजणे, तहान लागणे आणि मंद श्वास घेणे यांचा समावेश होतो. अशी लक्षणे दिसली तर वेळीच सावध व्हा, कारण ही लक्षणे कमी रक्तदाबाची असू शकतात.  
  • उच्च रक्तदाब किंवा नैराश्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • जास्त उलट्या, जुलाब, जुलाब, जास्त घाम येणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे तसेच भरपूर घाम आल्याने 
  • हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, अॅरिथमिया यासारख्या हृदयविकारांमुळे रक्तदाब कमी होतो.
  • रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे दमा, न्यूमोनिया यांसारख्या विकारांमध्ये रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते.
  • हार्मोनल असंतुलनामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. अशा प्रकारे गर्भधारणेदरम्यान रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • पाठीच्या कण्यातील विकारांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह न्यूरोपॅथी, मेंदू आणि मज्जाच्या दुखापतीमुळे रक्तदाब असामान्यपणे कमी असल्याचे आढळल्यास.
  • मूत्रपिंडाच्या विकारामुळे
  • गंभीर डेंग्यू तापामुळे तीव्र झुनोटिक संसर्ग,
  • शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा यामुळे,
  • कुपोषण, उपवास, अन्न-पाण्याची कमतरता यामुळे
  • शारीरिक श्रमामुळे,
  • मानसिक ताण, भीती, शोक, मानसिक आघात यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. 

अशा प्रकारे संरक्षण करा

  • कमी रक्तदाबाची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि औषध वेळीच घ्या.
  • जर तुमचा बीपी अचानक कमी होत असेल तर अशा परिस्थितीत लगेच मिठाचे पाणी प्या. याशिवाय आहारातील मीठाचे प्रमाण सामान्य ठेवा.
  • दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. यासाठी दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.
  • कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला टेन्शन येत असेल तर ते कमी करण्यासाठी रोज ध्यान किंवा योगासने करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल. 

लो ब्लड प्रेशरची समस्या असल्याच हा आहार घ्या

  • पुरेसे पाणी आणि पातळ द्रवपदार्थ प्या. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही.
  • व्हिटॅमिन बी-12 घटक असलेले पदार्थ म्हणजेच अंडी, मांस यांचा आहारात समावेश करावा.
  • हिरव्या भाज्या, लिंबूवर्गीय फळे खा.
  • आंबट पदार्थ, मासे, लोणचे यांचा आहारात समावेश करावा.