दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कॅन्सरवर मात केली आहे. महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आता महेश मांजेरकर 'कॅन्सरमुक्त' आहेत. त्यांचा आगामी सिनेमा 'ही अनोखी गाठ' च्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी महेश मांजरेकरांनी आपल्या आजारपणाचे किस्से सांगितले. महेश मांजेरकर यांनी कॅन्सरवर तर मात केली आहेच पण याअगोदर त्यांची अँगिजोप्लास्टी झाली आहे. त्यांच्या हृदयात तीन स्ट्रेन घातल्या आहेत. त्यामुळे ते स्वतःला 'स्टेन मॅन' असं संबोधतात.
दिग्दर्शक महेश मांजेरकर यांना जेव्हा कॅन्सर झाला त्यावेळी ते 'बिग बॉस' चा शो करत होते. या क्षेत्रात कमिटमेंटला अधिक महत्त्व आहे. अशावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी बिग बॉसचा अख्खा प्रोमो कॅन्सरच्या सर्जरीनंतर केला आहे. त्यावेळी त्यांनी लघवीची पिशवी, वेगवेगळ्या ट्यूब लावून हा प्रोमो केला आहे. नेक्स्ट टाईम असतो त्यामुळे स्वतःला एक संधी द्यायलाच हवी. आजारपणाच्यावेळी तुमची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची असल्याचं महेश मांजेरकर सांगतात.
दिग्दर्शक महेश मांजरेकर हे स्वतःला 'स्टेन्ट मॅन' म्हणून संबोधतात. महेश मांजरेकरांच्या हृदयात तीन स्टेन्ट आहेत. त्यामुळे आता माझं हृदय अतिशय चांगल वाटतं. आता मी मॅरेथॉनही धावू शकतो. जरी ते प्रॅक्टिकली शक्य नसलं तरीही माझं मन त्याला तयार आहे. महेश मांजरेकर म्हणतात कारण त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली आहे.
महेश मांजरेकर हे अतिशय खवय्ये व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आजूबाजूला कायमच गोतावळा असतो. असाच गोतावळा रुग्णालयातही त्यांच्यासोबत असायचा. तेव्हा एकदा डॉक्टर म्हणाले होते की, मी जेव्हा पण चेकअपला येईन तेव्हा तू कधी तरी त्या बेडवर दिसं. पण महेश मांजरेकरांनी या सगळ्या परिस्थितीला हिम्मतीने तोंड दिलं. त्यांनी रुग्णालयाचा ड्रेसही या दरम्यान घालण्यास नकार दिला होता.
I Will Over Come this .. हा विचार प्रत्येक रुग्णासाठी महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला महेश मांजरेकरांना डॉक्टरांनी तुम्हाला कॅन्सरची लागण झाल्याचं सांगितलं तेव्हा ते अतिशय नॉर्मल होते, धम्माल करत होते. तेव्हा डॉक्टरांना प्रश्न पडला की, यांना कळतंय की नाही? पण महेश मांजरेकर म्हणाले मी यावर ओव्हरकम करेन. कारण स्वीकार हा सर्वात महत्त्वाचा आहे. मला अनेक आजार आहेत तरी देखील मी आनंदी आहे. प्रत्येकाने महेश मांजरेकरांकडून ही गोष्ट शिकायला हवी. परिस्थिती येते पण त्याला खंबीरपणे साथ देणे गरजेचे आहे.