Daily Pushups : आपल्या शारीरिक आरोग्यासाठी पुशअप्स (Pushups) खूप फायदेशीर असतात. म्हणूनच जिम (Gym) जाणारे असोत किंवा कुस्तीपटू असो प्रत्येकाला पुशअप मारणं आवडतं. तुम्ही घरी किंवा कोठेही पुशअप (Pushups at home) करू शकता. हा व्यायाम जितका प्रभावी आहे तितकाच तो करण्यासही सोपा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की एका दिवसात किती पुशअप्स (Daily Pushups) करावं आणि पुश अपचे काय फायदे आहेत?
जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की एका दिवसात किती पुश अप केले पाहिजेत तर याचं उत्तर म्हणजे याला कोणताही नियम नाही. दरम्यान एक्सरसाईज करणाऱ्या लोकांना विचारलं असता ते म्हणाले की, निरोगी व्यक्ती एका वेळी सरासरी 20-25 पुशअप्स करू शकते. तर नियमित सराव करून, ही संख्या 40-50 किंवा त्याहून अधिक वाढवली जाऊ शकते.