डासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय

डास हे अनेक आजारांचे प्रमुख कारण. डास मिळणार नाहीत असे ठिकाण किमान भारतात तरी मिळणे मुष्कील. त्यामुळे आजघडीला आपण डास संपवू शकत नसलो तरी, पळवू तरी नक्कीच शकतो. त्यासाठी अवलंबा हे घरगूती उपाय...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 5, 2017, 10:32 PM IST
डासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय title=

मुंबई : डास हे अनेक आजारांचे प्रमुख कारण. डास मिळणार नाहीत असे ठिकाण किमान भारतात तरी मिळणे मुष्कील. त्यामुळे आजघडीला आपण डास संपवू शकत नसलो तरी, पळवू तरी नक्कीच शकतो. त्यासाठी अवलंबा हे घरगूती उपाय...

लवंग आणि नारळाच्या तेलाचा उपयोग - हा एक डासांना पळवून लावण्याचा साधा सोपा उपाय आहे. लवंग आणि खोबरेल तेलाचे मिश्रण बनवा आणि ते झोपताना आपल्या शरीराला लावा. गंमत अशी की डासांना लवंग आणि खोबरेल तेलाचा वास मुळीच सहन होत नाही. परिणामी डास छूमंतर होतो.

कापराचा धूर - कापूर हा तसा सर्वांकडे मिळणारा पदार्थ. आजवर केवळ प्रामुख्याने पूजेसाठीच वापर होणाऱ्या या कापराचा आणखीही एक मोठा फायदा आहे. डासांना घरातून पळवून लावण्यासाठी घरातील कोपऱ्यांमध्ये कापूर जाळा. पण, हे करत असताना कुठे आग भडकणार नाही याची काळजी घ्या. कापराचा धूरही डासांना सहन होत नाही.

लिंबाचा रस - लिंबाचा रस हा सुद्धा डासांना पळवण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. लिंबवाचा रस एका लिक्विड रिफिलमध्ये भरा आणि त्याचा घरात वापर करा. डास पळतील.

नीलगीरीचे तेल -  निलगीरीच्या रसानेसुद्धा डासांपासून मुक्ती मिळू शकते. एका रिकाम्या रिफिलमध्ये नीलगीरी तेल भरा आणि त्याचा वापर घरात करा.
वरील पर्याय वापराल तर डासांपासून मुक्ती मिळवण्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकाल.