या '4' पदार्थांंमुळे कमी होईल हार्ट ब्लॉकेजचा धोका

आजकाल हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

Updated: Jul 9, 2018, 05:54 PM IST
या '4' पदार्थांंमुळे कमी होईल हार्ट ब्लॉकेजचा धोका  title=

मुंबई : आजकाल हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आहाराच्या, झोपण्याच्या विचित्र सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे आपण नकळत लाईफस्टाईलशी निगडीत अनेक समस्यांचा धोका वाढवला आहे. तरूण वयातील मंडळीदेखील आजकाल कार्डिएक अटॅक, हृद्यविकाराच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत विशेष दक्षता घेणं गरजेचे आहे. 

हार्टमध्ये ब्लॉकेज निर्माण होणं आणि वेळेवर त्याचं निदान न होणं हे हार्ट अटॅकचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे औषधोपचाराच्या सोबतीने आहारातील कोणकोणते पदार्थ हार्टमधील ब्लॉकेज टाळण्यासाठी मदत करतील हे नक्की जाणून घ्या.  हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत ...

1. कलिंगडमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो अ‍ॅसिड असते. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती होते. या ऑक्साईडमुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. दाह कमी करणं, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कलिंगडामुळे पोटाजवळ फॅट साचून राहण्याची शक्यता मंदावते. 

2. हळदीमध्ये व्हिटॅमिन बी 6 घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हृद्याला बळकटी मिळते. हार्ट ब्लॉकेजचा त्रास कमी करण्यासाठी नियमित हळदीचं दूध प्यावे. 

3. नियमित लिंबूपाणी प्यायल्यानेही हार्ट ब्लॉकेज कमी करण्यास मदत होते. लिंबूपाण्याअम्ध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचा धोका कमी होण्यास मदत होते. 

4.हृद्यविकाराचा त्रास असणार्‍यांमध्ये वेलचीचं सेवनदेखील फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही वेलचीचं सेवन आरोग्यदायी समजले जाते. नियमित वेलची खाल्ल्यानेही हार्ट ब्लॉकेजच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.  'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका ..