दालचिनी आणि लिंबाच्या पेस्टने दूर करा पिंपल्सचा त्रास

अ‍ॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्‍याचे सौंदर्य कमी करतो.

Updated: Jan 21, 2018, 04:03 PM IST
दालचिनी आणि लिंबाच्या पेस्टने दूर करा पिंपल्सचा त्रास  title=

मुंबई : अ‍ॅक्ने किंवा मुरुमांचा त्रास हा चेहर्‍याचे सौंदर्य कमी करतो.

नकळत याचा परिणाम त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही होतो. मग मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ‘दालचिनी आणि लिंबाचा रस’ हा घरगुती उपाय करून पाहिला आहे का ?

घरगुती उपाय 

दालचिनीमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, मुरुमांची निर्मिती करणार्‍या बॅक्टेरियांचा नाश होण्यास मदत होते. तसेच चेहर्‍यावरील घाण, अतिरिक्त तेल व ब्लॅकहेड्स कमी होण्यासही मदत करतात. तर लिंबामुळे मुरुमांवर व त्याच्या डागांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. लिंबू मुरुमांमुळे येणारी सूज, लालसरपणा कमी करण्यास मदत करतो.

 

 ‘दालचिनी आणि लिंबाची’ पेस्ट 

 
मुरुमांच्या आकार  व संख्येनुसार दालचिनीची पावडर घेऊन त्यात ताज्या लिंबाचा रस मिसळा.

तयार पेस्ट मुरुमांवर लावून काही तासांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

मात्र चेहरा धुतल्यानंतर लगेचच साबण किंवा फेसवॉशचा वापर करू नये.

मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेसपॅक्सचादेखील वापर करू शकता.

तुमची त्वचा संवेदनशील असल्यास थेट लिंबाचा त्वचेवर वापर करू नये. यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते.