मुंबई : वाईनचा आनंद जसा पार्ट्यांमध्ये घेतला जातो. तसाच आरोग्यदायी फायद्यांसाठीही होतो. मात्र त्याचे सेवन प्रमानात असणं गरजेचे आहे.
अनेकजण वाईनची बॉटल घरात ठेवतात. थोडी जुनी झाली तर त्याचे सेवन करतात. मात्र रेड वाईनच्या बॉटलचे कॉक/ झाकण सैल झाल्यास किंवा बाटलीचा थेट वार्याशी खूपवेळ संबंध आल्यास वाईन खराब होते.
मग साठवणीतील वाईन खराब झाल्याचं ओळखण्यासाठी हा एक्सपर्ट सल्ला नक्की लक्षात ठेवा.
रेड वाईन ही आरोग्यवर्धक समजली जाते. कारण रेड वाईनमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. प्रमाणात रेडवाईनचं सेवन केल्यास फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो. शरीरातील चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढतात.
#1 रेड वाईनच्या बाटलीत ब्राऊन रंगाचा थर दिसल्यास ती खराब झाल्याचे समजावे. वाईट वाईन पिवळसर किंवा ब्राऊन रंगाची झाल्यास ती ऑक्सिडाईस झालेली असते.
#2 वाईनचा वासही ती खराब झाल्याचे संकेत देते. जर वाईनला व्हेनेगरप्रमाणे किंवा ओल्या कार्डबोर्डप्रमाणे वास येत असल्यास ती खराब झाली असे समजावे.
#3 वाईनच्या बॉटलचे कॉक निघाले असल्यास ती उष्णतेने वाढली असल्याचे समजावे. यामुळेच बॉटलवरील कॉक सरकते.
#4 पेन्ट थिनरप्रमाणे वास येत असल्यास, केमिकल फ्लेवरचा वास येत असल्यास ती खराब झाल्याचे समजा.