मुंबई : मद्यपानानंतर हॅंगओव्हर होणे स्वाभाविक आहे. हॅंगओव्हरमुळे तुमच्या पूर्व दिवसाची वाट लागते. एकही काम होत नाही, कशात लक्ष लागत नाही. डोके जड होते, दुखू लागते. त्यामुळे ही चढलेली नशा नेमकी उतरवायची कशी? तर या घरगुती उपायांनी... तुम्हीही हे उपाय ट्राय करुन बघा...
#1. हॅंगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही संत्र्याचा रस घेऊ शकता. यातील व्हिटॉमिन सी मुळे उलटी, मळमळ यावर आराम मिळतो.
#2. हॅंगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी हा लोकप्रिय उपाय आहे. एक कप कडक कॉफीमुळे हॅंगओव्हर गायब होते. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या. यामुळे सुस्ती दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो.
#3. हॅंगओव्हरपासून बचावासाठी मद्यपान करण्यापूर्वी काही वेळ आधी केळे खा. यातील पोटॅशियम, कार्बोहायट्रेड शरीराला रिहाईड्रेट ठेवतात.
#4. मद्याची नशा उतरवण्यासाठी आल्याचा चहा प्या. यामुळे डोकेदुखीवर आराम मिळेल.
#5. दह्यापासून बनलेली लस्सी हॅंगओव्हर उतरवण्यास मदत करते. त्यामुळे हॅंगओव्हर उतरवण्यासाठी हा उपाय नक्की करुन पहा.
#6. नारळाचे पाणी पिऊन तुम्ही हॅंगओव्हर उतरवू शकता.