मुंबई : दातदुखण्याची समस्या ही अशी समस्या आहे. ज्यामुळे माणून ना नीट खाऊ शकत, ना नीट बोलू शकत, ऐवढंच काय तर दात दुखल्यामुळे डोकं आणि चेहरा देखील दुखू लागतो. ज्यामुळे आपल्याला काहीही सुचत नाही. यामुळेच अनेक लोक म्हणतात की, मला सगळं दुखणं परवडलं, परंतु दाताचं दुखणं नको. दात दुखण्याची समस्या दात खराब झाल्यामुळे किंवा दातात पोकळी असल्यामुळे देखील असू शकते. बॅक्टेरियाचे संसर्ग, कॅल्शियमची कमतरता किंवा दात व्यवस्थित न साफ करणे हे देखील यासाठी कारणीभूत असू शकते.
दात दुखू लागले की, लोकांना नकोसं होतं. ज्यामुळे लोक घरच्या घरी उपाय करु पाहातात. परंतु कितीही उपाय केलं तरी बऱ्याचदा दात दुखणं थांबत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा उपायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची दात दुखण्याची समस्या कमी होईल.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते कांद्याच्या वापराने दातदुखी दूर केली जाऊ शकते. आता कांदा वापरायचा कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आज आम्ही तुम्हाला दातांची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा वापर कसा करू शकतो हे सांगणार आहोत.
कांदा आणि लिंबू एकत्र वापरून दातांच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अशा स्थितीत तुम्ही एका भांड्यात मीठ आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण तयार करा, आता तयार मिश्रणात तुम्ही कांद्याचा तुकडा टाका आणि ते मिश्रण घेऊन कांद्याच्या तुकड्याने दात घासा. असे केल्याने केवळ पोकळीपासून आराम मिळत नाही, तर दातदुखीही दूर होऊ शकते.
अनेकदा लोकांना असे वाटते की, दातांवर कांदा लावल्यास दुर्गंधी येण्यासारखी समस्या उद्भवू शकते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जर कांद्यामध्ये मीठ वापरल्यास ते दात स्वच्छ तर करतातच शिवाय दातांचा त्रासही दूर करू शकतात. अशा वेळी कांद्याचे दोन तुकडे करून त्यावर मीठ शिंपडून दातांना चोळावे लागते. असे केल्याने फायदा होऊ शकतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)