मुंबई : पार्टनरच्या घोरण्यामुळे हैराण आहात? त्यामुळे तुमची झोप अपुरी होते आणि सकाळी थकल्यासारखे वाटते? मग काळजी करु नका. कारण याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. यामुळे फक्त घोरण्यापासून सुटका मिळणार नाही तर तुम्हाला शांत झोपही मिळेल. खूप जास्त थकल्यामुळे किंवा नाक बंद झाल्यामुळे व्यक्ती घोरू लागतो. अशावेळी इतरांना मात्र घोरण्याचा खूप त्रास होतो. या समस्येपासून सुटका करण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पहा...
# एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध घालून नीट मिक्स करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. असे केल्याने काही दिवसात घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.
# रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर घालून प्या. असे केल्याने घोरण्याची समस्या दूर होईल.
# हळद अत्यंत गुणकारी आहे, हे तर आपण जाणतोच. रोज झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हळद घातलेले दूध प्यायल्यास घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
# झोपण्यापूर्वी पुदीन्याचे तेलाचे काही थेंब पाण्यात घालून गुळण्या करा. असे केल्याने नाकातील सूज कमी होते आणि श्वास घेणे सोपे होते. नाकाजवळ पुदीन्याचे तेल लावल्यासही खूप फायदा होईल.