मुंबई : उन्हाळ्याच्या तडाख्यात नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते. ही समस्या वरवर सामान्य वाटत असली तरी यावर उपचार करणे आवश्यक आहे. अशावेळी उन्हात फिरणे, मसालेदार खाणे, नाकावर लागणे किंवा सर्दी झाल्याने ही समस्या उद्भवते. रक्त येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. चक्कर येणे, डोके जड होणे, गरगरणे ही लक्षणे जाणवतात. नाकातून रक्त येण्याची समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय...
#1. थंड पाण्याची धार डोक्यावर सोडा. नाकातून रक्त येणे बंद होईल.
#2. नाकातून रक्त येऊ लागल्यावर तोंडाने श्वास घेणे सुरु करा.
#3. कांदा कापून नाकाजवळ धरल्यानेही फायदा होईल.
#4. नाकातून रक्त येऊ लागल्यास डोके पुढच्या बाजूला वाकवा.
#5. तुरडी पाण्यात उगाळून नाकावर लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
#6. उन्हाळ्याच्या हंगामात सफरचंदाच्या मुरांब्यांत वेलची घालून खाल्यानेही फायदा होतो.
#7. बेलाची पाने पाण्यात उकळवून त्यात खडीसाखर किंवा बताशा घालून ते पाणी प्या. नक्कीच फायदा होईल.
#8. नाकातून रक्त येऊ लागल्यास बर्फ कपड्यात गुंडाळून नाकावर ठेवल्याने फायदा होईल.