वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

अनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्यायही स्वीकारले जातात.

Updated: Jun 3, 2019, 04:00 PM IST
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय title=

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे फार कठीण झाले आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे नियमित आहाराकडे दुर्लक्ष होते. त्याचप्रमाणे बाहेरचे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थसुद्धा वजन वाढीचे मुख्य कारण आहेत. उंची, वय, लिंग आणि वजन यांचा समतोल राखणे आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते. अनेकदा वजन कमी करून घेण्यासाठी शस्त्रक्रियेसारखे टोकाचे पर्यायही स्वीकारले जातात. त्यापेक्षा जीवनशैलीतील काही बदल वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मदतीचे ठरतात. 

- भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळे ते जास्त प्रमाणात खावेत. केळं आणि चिकू खाऊ नये त्याने लठ्ठपणा वाढतो. 

- जेवताना टॉमेटो आणि कांद्याच्या कोशिंबीरमध्ये मिरपूड आणि मीठ घालून खावे. त्याने शरीराला व्हिटॅमिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम मिळते. 

- ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा प्यायल्यास वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 

- जेवणापूर्वी गाजर खावे त्यामुळे खाल्यास भूक कमी होते.

- एका कपात उकळत्या पाण्यात अर्धा चमचा बडिशोप टाका. ते मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा. ठंड झाल्यानंतर ते पाणी प्या. असे नियमित केल्यास तीन महिन्यांमध्ये वजन कमी होते.

- कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

- सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरी बारीक करुन चूर्ण बनवावे. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावे.

- पपई नियमितपणे खावी. पपईचं पीक हे वर्षभर बाजारात उपलब्ध असतं. खूप दिवस पपई खाल्ल्यास कंबरेची चरबी कमी होते. 

- जेवणामध्ये दही खाल्ल्यास चरबी कमी होते. ताक ही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावे.