Hema Malini Fitness And Beauty Secrets : बॉलिवूडटी 'ड्रिम गर्ल' म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज 75 वा वाढदिवस. या वयातही हेमा मालिनी यांचा फिटनेस आणि त्वचा अगदी विशीतल्या मुलींना लाजवेल असा आहे. हेमा मालिनी यांचा फिटनेस त्यांना मेंटेन राहण्यासाठी खूप मदत करतो. जे खरंच कौतुकास्पद आहे. एका ठराविक वयानंतर अँटी एजिंगची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. पण हेमा मालिनी यांची तजेलदार, तुकतुकीत त्वचा याला अपवाद ठरते. Platinum Jubilee साजऱ्या करणाऱ्या हेमा मालिनी यांचा सिक्रेट डाएट पाहणार आहोत.
हेमा मालिनी यांनी आपला फिटनेस अतिशय चांगल्या प्रकारे राखला आहे. हेमा मालिनी जीममध्ये जात नाहीत पण दररोज १०-१५ मिनिटे सायकल चालवणे हा त्यांच्या दिनक्रमाचा खास भाग आहे.
हेमा मालिनी रोज ४५ मिनिटे प्राणायामही करतात. कामानिमित्त कुठेही बाहेर गेल्या तरी योगा आणि प्राणायाम नक्कीच करतात. हेमा मालिनी गेली अनेक वर्षे योगा करत आहेत आणि त्यामुळेच आजही त्या खूप तंदुरुस्त आहेत. योगाच्या सर्व आसनांमध्ये त्या निपुण आहेत.
हेमा मालिनी या शास्त्रीय नृत्यांगना आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण हेच त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे. हेमा मालिनी सांगतात की, त्या नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि तणावही कमी होतो.
आता त्याच्या डाएट प्लॅनबद्दल बोलूया. हेमा मालिनी आठवड्यातून 2 दिवस उपवास करतात. ज्यामध्ये त्या फक्त ताजी फळे आणि सुकामेवा खातात. शाकाहारी असल्याने, त्यांच्या आहारात मुख्यतः हिरव्या भाज्या, फळे, सलाड आणि कडधान्ये इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय 2 कप ग्रीन टीचाही त्याच्या दिनक्रमात समावेश आहे.
सकाळी: कोमट पाण्यात मध आणि लिंबू
न्याहारी: फळे, सॅलड आणि 1 ग्लास रस किंवा ग्रीन टी
दुपारचे जेवण: 1 वाटी डाळ, 2 भाज्या, भात, रसमसह 2 पोळ्या
रात्रीचे जेवण: भाजी, डाळ, पोळी किंवा भात ( रात्रीचे जेवण 8 च्या आधी)
एका मुलाखतीदरम्यान हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, साखर खाणे पूर्णपणे बंद केले आहे. बाहेर साखरेऐवजी मधाचे सेवन करण्याला हेमा मालिनी प्राधान्य देतात. चहा देखील पिताना मधाचा समावेश आहे. जंकफूडपासूनही राहतात दूर.