CID च्या दया, क्रिकेटर अझरुद्दीननंही केलंय हेअर ट्रान्सप्लांट; तुम्ही पण विचार करताय? अशी घ्या काळजी

Hair Transplant Tips : हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर काय काळजी घ्यावी? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? अभ्यासात सांगितल्या टिप्स

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 16, 2023, 12:06 PM IST
CID च्या दया, क्रिकेटर अझरुद्दीननंही केलंय हेअर ट्रान्सप्लांट; तुम्ही पण विचार करताय? अशी घ्या काळजी title=

Hair Growth And Transplant : केस आपल्या सौंदर्याला अधिक सुंदर करतात. अनेकांना हेअर फॉल, हेअर थिनिंग आणि तरुणपणात केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्या जाणवतात. सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटिंना देखील हेअर ट्रान्सप्लांट करावं लागत आहे. CID मधील दया, क्रिकेटर अझरुद्दीन आणि अभिनेता राजपाल यादव यांनी देखील हेअर ट्रान्सप्लांट केलंय. 

ज्या लोकांना केस प्रत्यारोपणाची प्रक्रिया करून घ्यायची आहे, त्यांच्या मनात भीती असते की त्याचे दुष्परिणाम काय होतील किंवा या प्रक्रियेनंतर त्यांना केसांची काळजी कशी घ्यावी लागेल, केस किती वेळा धुवावे लागतील अशा प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. 

ट्रान्सप्लांटनंतर कधी धुवाल केस? 

NCBI च्या रिपोर्टनुसार, हेअर ट्रान्सप्लांटनंतर सर्जन काही गाईडलाईन शेअर करतील. वापरल्या गेलेल्या टेक्नॉलॉजीनुसार कधी 48 तास तर कधी एक आठवडा वाट पाहावी लागते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा ठरतो. 

कोणता शॅम्पू वापरावा?

  • यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार सल्फेट-मुक्त शैम्पू आणि कोमट पाणी मिसळावे लागेल. किती शॅम्पू वापरावा यासाठी सर्जनचा सल्ला घ्या.
  • कोमट पाण्याचा वापर करून आपली टाळू हळूवारपणे ओली करा किंवा स्पर्श करून थेट टाळूवर शॅम्पू लावा. गरम पाणी टाळा, कारण यामुळे चिडचिड होऊ शकते.
  •  शैम्पू पातळ करा आणि आपल्या टाळूवर थोड्या प्रमाणात लागू करा. केस प्रत्यारोपणानंतर पहिल्या 10 दिवसात डोक्याला हात लावू नका. 11व्या दिवसापासून, तुम्ही तुमच्या बोटांनी हळूवारपणे शॅम्पू करू शकता.

केस धुताना कोणते पाणी वापरावे

केस धुताना कोमट पाण्याचा वापर करावा. खूप जोर लावून किंवा अधिक जोरात शॅम्पू लावू नका. मऊ टॉवेलच्या मदतीने केस स्वच्छ साफ पुसावेत. अन्यथा नैसर्गिक पद्धतीने केस सुकण्याची वाट पाहावी. 

हेअर ट्रान्सप्लांटनंतर काय काळजी घ्याल?

  • डोके थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्या. प्रत्यारोपणानंतर पहिल्या आठवडा अधिक महत्त्वाच असतो. यावेळी किरणांमुळे नुकसान होऊ शकते.
  • जोरदार व्यायाम टाळा कारण यामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढू शकतो आणि केस सैल होऊ शकते.
  • धूम्रपान आणि जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्त परिसंचरण बिघडू शकते, जे उपचार प्रक्रियेसाठी महत्वाचे आहे.
  • भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा. यामुळे केस निरोगी राहतील.
  • सुरुवातीला, कठोर रसायने असलेली स्टाइलिंग उत्पादने वापरणे टाळा कारण ते उपचारांमध्ये व्यत्यय आणू शकतात.
  • अजिबात ताण घेऊ नका कारण केसांचा थेट संबंध तुमच्या मानसिक आरोग्याशी असतो.