मुंबई : देशात अतिशय झपाट्यानं फैलावणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात तब्बल २७,६७,२७४ जण आले आहेत. त्यामुळे कोरोना या धोकादायक व्हायरसला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत असणं फार गरजेचं आहे. एका अमेरिकन अभ्यासानुसार, विषाणूशी लढण्याचा कोणताही प्रयत्न व्हिटॅमिन-ई शिवाय अपूर्ण आहे. मासे, लाल शिमला मिर्ची, बदाम यांसारख्या पदार्थांच्या माध्यमातून शरीरास व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात मिळते.
आपल्याला बर्याच रोगांशी लढण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि जिएक्सेन्थिन आणि व्हिटॅमिन ई सारखे महत्त्वपूर्ण रसायन असतात. शिमला मिर्ची खाल्लायनं शरीर बीटा कॅरोटीनचं रेटिनॉलमध्ये रुपांतर करतं.
या सर्व रसायनांच्या मदतीनं हृदयाशी संबंधीत आजार, ऑस्टियोपोरोसिस, आर्थरायटिस, ब्रॉकायटिस, अस्थमा सारख्या समस्यांमध्ये फायदा मिळतो. यामुळं त्वचेचा रंगही उजळतो.
व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे हे रोग उद्भवतात
- शरीरात ऑक्सिजनची कमतरता.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत नाही.
- त्वचेची समस्या.
- मानसिक विकार.
- रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
व्हिटॅमिन ईचे शरीरास होणारे फायदे
- म्हातारपण लवकर येत नाही.
- डोळ्यांसाठी फायदेशीर.
- मानसिक रोगांमध्ये फायदेशीर
- त्वचेचा रंगही उजळतो.