बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी

Bad Cholesterol: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी त्याचे लक्षण लवकर लक्षात येत नाहीत. अशावेळी आधीपासूनच काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 13, 2023, 06:10 PM IST
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आताच ताटात वाढा 'या' भाज्या; हृदय राहिल निरोगी title=
health tips Vegetables For Cholesterol Control in marathi

Vegetables For Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल हे शरीर निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. परंतु त्याचे जास्त प्रमाण झाल्यास हृदयविकाराचा झटका किंवा हृदयरोगासारखे आजार निर्माण होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल हे एका विशिष्ट चरबीसारखा आहे. रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते आणि त्याची पातळी सतत वाढत राहत. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते एक चांगले आणि एक वाईट. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा आरोग्याच्या समस्या सुरू होतात. हृदयविकार, मज्जातंतू संबंधित रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. 

असंतुलित आहार, शारिरीक हालचाली कमी होणे, व्यायामाचा अभाव यामुळं कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकते. कोलेस्ट्रॉल वाढण्याची कोणतीच स्पष्ट चिन्हे वा लक्षणे दिसत नाहीत. तसंच, ते लगेच ओळखता देखील येत नाही. पण जर रोजचा आहार योग्य आणि संतुलीत असेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी आहारात काही भाज्या आवर्जुन समावेश करावा.  

कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या भाज्या 

ब्रोकोली

ब्रोकोली ही एक अशी भाजी आहे ज्यात हाय सोल्यूबल फायबरदेखील असते. ज्याच्या सेवनामुळं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये सल्फरदेखील असते आणि त्यामुळं पाचनसंस्थादेखील निरोगी राहते. अशावेळी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ब्रोकोली तुमच्या आहारात समाविष्ट करा. 

मुळा

एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंथोसायनिन याची मात्रा मुळ्यात अधिक असते. त्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर यात कॅल्शियम आणि पॉटेशियमबरोबरच अँटी ऑक्सिडेंट्सदेखील असतात. ज्यामुळं उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात येते आणि हृदयरोगासारखे आजार दूर करते. डायट्री फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मुळाही खाऊ शकतो.

गाजर

बीटा कॅरोटीनचे गुणधर्म असलेले गाजर रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. त्यातील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. पचनसंस्थेला कोलेस्टेरॉल शोषण्यापासून रोखतात. अशा परिस्थितीत आहारात समाविष्ट करण्यासाठी गाजर ही चांगली भाजी आहे.

पालक

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.  पालक खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात मिळतात. पालक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पालेभाज्या, सूप आणि सॅलड बनवूनही पालक खाऊ शकतो.

बीट

बीटरूटमध्ये सोल्यूबल आणि इनसोल्यूबल अशा दोन्ही पद्धतीचे फायबर असतात. यात नायट्रेटची खूप चांगली मात्रा असते. बीट रक्तवाहिन्या साफ करण्यास खूप प्रभावशाली आहे. तसंच, उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचेही काम करते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)