नसांमध्ये साचलेले घाण कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढेल 'हा; मसाला; असं करा सेवन!

How To Reduce Cholesterol Naturally: घरच्या घरी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 12, 2024, 12:24 PM IST
नसांमध्ये साचलेले घाण कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढेल 'हा; मसाला; असं करा सेवन! title=
health tips in marathi how to reduce cholesterol naturally at home with using saunf

How To Reduce Cholesterol Naturally: खाण्या-पिण्याच्या बदलत्या वेळा आणि लाइफस्टाइल या कारणांमुळं हाय कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या बनली आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळले जातात एक गुड (HDL) आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल (LDL). जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढचो तेव्हा त्याला हाय कोलेस्ट्ऱॉल असं म्हटलं जातं. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यासारख्या समस्यांचा झोका वाढतो. अशावेळी शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

काही घरगुती उपायांनी तुम्ही शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करु शकता. आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. त्यांच्या मदतीने तुम्ही शरीरात साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी ठरु शकते. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

हाय कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर आहे बडिशेपचे पाणी? (Benefits Of Fennel Seed Water in High Cholesterol)

शरीरात वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बडिशेपचे पाणी खूप फायदेशीर आहे. बडिशेपमध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स सारखे पोषक तत्वांची मात्रा अधिक असते. जे आपलं शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सीडेंट असतात. जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याव्यतिरिक्त यात पोटॅशियमदेखील आढळले जाते. ज्यामुळं हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. याच्या नियमित सेवनाने पचनसंस्था निरोगी राहते तसंच, वजन कमी होण्यासही मदत होते. 

कसं बनवाल बडिशेपचे पाणी? 

बडिशेपचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात 2 चमचे बडिशोप टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठून याचे पाणी गाळून घ्या. रिकाम्या पोटी याचे सेवन करा. हवं असल्यास तुम्ही हे पाणी उकळून त्याचे सेवन करु शकता. दरररोज सकाळी रिकाम्या पोटी बडिशेपच्या पाण्याचे सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्ऱल कमी होण्यास मदत होते. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार योग्य असणेही गरजेचे आहे. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा; यामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अव्होकॅडो या फळामध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅट्स असतात. हे फळ खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.सीफूड विशेषत: मासे, ज्यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिडचा उत्तम स्त्रोत आहे, हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)