Health Tips: शरीराला आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा करणारा एक घटक म्हणून अंड्यांकडे पाहिलं जातं. एका अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून जातात. अंड्यांमध्ये सहसा विटामिन बी12, विटामिन डी, सेलेनियम, आयोडिन आणि विटामिन बी2 (राइबोफ्लेविन) हे घटक असतात, ज्यांचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाचे असणारे फोलेट, कोलीन आणि लोह असे घटकही अंड्यामध्ये असतात. शरीराला गरज असणाऱ्या Goof Cholestreol चा पुरवठासुद्धा हे अंड करतं. पण, अंड्याचं अतीसेवन तुम्हाला धोक्यात टाकू शकतं. त्यामुळं शरीरात आहारातील या घटकाचाही नियंत्रीत पुरवठा केला जाणं योग्य.
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं, की हृदयावर त्याचे अनिष्ट परिणाम होतात असं आपण सर्वांनीच वाचलं आहे. पण, या कोलेस्ट्रॉलमध्येही दोन प्रकार असतात. ज्यापैकी एक आरोग्यास पूरक असतो तर, दुसरा घातक. यापैकी पूरक कोलेस्ट्रॉल शरीरातील सुदृढ पेशींसमवेत, उती, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोनमध्ये वाढ करतं. तर, घातल कोलेस्ट्रॉल पक्षाघाताचा धोका वाढवतं.
'यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (सीडीसी)' च्या मते एचडीएल कोलेस्ट्रॉल हृदयाच्या अनेक समस्या दूर करण्यात मोठी भूमिका बजावतं. अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असलं तरीही ते नुकसानदायक नसतं. इतर खाद्यपदार्थांमधील कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत हा प्रकार अगदी वेगळा असतो.
एका अंड्यानुसार प्रमाण पाहायचं झाल्यास त्यामध्ये 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असतं. अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल सामावलेलं असून दररोज किमान एक अंड खा, असा सल्ला डॉक्टर देतात. 'कोरियन जर्नल फूड साइंस ऑफ एनिमल रिसोर्सेज'मधील एका अहवालानुसार दर आठवड्याला व्यक्तीनं 2 ते 7 अंडी खावीत. किंबहुना दर दिवसाआड 2 अंडी खाल्यासही शरीराला मोठा फायदा होतो. त्यामुळं अंड्याचा पिवळा भाग खाणं चांगलं नाही असं तुम्हीच ठरवण्याआधी तज्ज्ञांचे अहवालही विचारात घ्या.
(आहारविषय बदल करण्याच्या विचारात असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)