Health Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!

Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

BGR | Updated: Nov 13, 2022, 01:28 AM IST
Health Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा! title=
Causes Of Heart Attack

Heart Attack: सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi) यांचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. जिममध्ये व्यायाम (Gym) करताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सिद्धांतचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. सिद्धांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव, सिद्धार्थ शुक्ला, तसेच केकेचा मृत्यू देखील हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.

हृदयविकाराचा झटका का येतो (What causes a heart attack) ? 

मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाबाचा (blood pressure) आजार असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे जिमला लावण्यापूर्वी हृदयाची तपासणी करणं आवश्यक आहे.

हृदयाच्या धमन्यांमध्ये एरिथेमॅटस प्लेक जास्त व्यायाम (Gym Exercise) केल्यानं फुटण्याचा धोका असतो त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. इतरांच्या सांगण्यावरून क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं. स्वत:च्या क्षमतेबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे.

तणाव आणि झोपेची कमतरता या दोन गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. योग्य झोप न झाल्यास किंवा जास्त तणाव घेतल्याने देखील हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

आणखी वाचा - किडनी खराब होण्याआधी देतात हे 5 संकेत, कधीच दुर्लक्ष करु नका

दरम्यान, तंबाखू, सिगारेट या गोष्टींचा नशा करणं, जास्त कॅफिन घेणं किंवा जंक फूड खाणं या गोष्टींमुळे देखील तुम्ही हृदयविकाराला आमंत्रण देता. तुमचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात असल्यास कोणताही धोका नसतो. मात्र, अनेकदा नको त्या वेळी खाणं किंवा बाहेरील पदार्थ जास्त खालल्यानं अनेक समस्या जाणवतात.