भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती

भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात.

Updated: Mar 3, 2022, 08:14 PM IST
भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती title=

मुंबई : भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. हे तुम्हाला माहित आहे का?  याच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, लोह, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम हे घटक भाजलेल्या चण्यांमध्ये आढळतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर घटक आहेत.

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे खाण्याने शरीराला काय काय फायदे होतात हे जाणून घ्या.

पोटासाठी फायदेशीर

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यात फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच अपचन आणि अॅसिडिटीची समस्याही दूर होते.

प्रतिकारशक्ती वाढवते

भाजलेल्या चण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे भाजलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन टाळता येते.

साखरेची पातळी नियंत्रित राहते

भाजलेल्या चण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे खाल्ल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

अशक्तपणाची तक्रार दूर होते

भाजलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अॅनिमिया दूर होतो. कारण भाजलेल्या चण्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याचे रोज सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

शरीरात ऊर्जा राहते

भाजलेले हरभरे रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. जर एखाद्याला अशक्तपणा जाणवत असेल, तर त्याने रोज भाजलेले चणे खावे.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)