मुंबई : पाणी हे उभ्याने प्यावं की बसून प्यावं? याबाबत कायमच एक संभ्रम पाहायला मिळतो. पाणी आपल्या जीवनात खूप महत्वाचं आहे. शरीरात पाण्याची योग्य पातळी असणं अत्यंत गरजेचं आहे.
मानवी शरीरात ७०% पाणी असते. यावरूनच आपल्याला पाण्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे. याचा अंदाज येईल.
तसेच आपल्या मेंदूला योग्यरितीने चालण्यासाठी ८० टक्के पाण्यांची आवश्यकता आहे. तर फुफ्फुसांना ९० टक्के आणि रक्त तयार होण्याकरता ८३ टक्के तसेच हड्यांना ३० टक्के आणि त्वचेला ६४ टक्के पाण्याची आवश्यकता आहे.
आरोग्य तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शरीर पाण्याने कायम हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. विशेष करून उन्हाळ्यात याची विशेष काळजी घ्यावी.
आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की पाणी बसून प्यावे की उभे राहून? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देत आहोत.
आपण अनेकदा ग्लास किंवा बाटली उचलताना पाणी पिण्यास सुरुवात करतो आणि असे करण्यास काही हरकत नाही असे वाटते. पण पाणी पिण्याची ही योग्य पद्धत नाही.
कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा शरीराला पाण्याची गरज असते. पोषक तत्व पूर्णपणे उपलब्ध होत नाहीत. यामुळे तुमच्या शरीराला घालता.
उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी सरळ शरीरातून खाली उतरते. पण बसून पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीरात ते पाणी पसरते. जे खूप महत्वाचे आहे.
आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे की, बसून पाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे. बसून पाणी प्यायल्याने मेंदूपर्यंत पाणी पोहोचते आणि शरीराच्या क्रियाकलाप निरोगी राहतात.
असे केल्याने पचनक्रिया सुरळीत राहून शरीरातील घाण निघण्यास मदत होते.