आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस...

बटाट्याचा कॊणताही पदार्थ आपण आवडीने खातो.

Updated: May 12, 2018, 02:59 PM IST
आरोग्याच्या या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस... title=

मुंबई : बटाट्याचा कॊणताही पदार्थ आपण आवडीने खातो. त्यात बटाट्याचे तळलेले पदार्थ आपल्याला अधिक आवडतात. पण कच्च्या बटाट्याचा रस देखील खूप फायदेशीर आहे. संधीवात, गाऊट, eczema, gastritis यावर उपायकारक आहे. तर जाणून घेऊया बटाट्याच्या रसाचे फायदे...

१. कच्चा बटाट्याच्या रसात anti-inflammatory म्हणजेच दाहशामक गुणधर्म असतात. त्याचबरोबर कोपर, मान, पाठ, खांदे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा एक परिमाणकारक नैसर्गिक उपाय आहे. तसंच सांधेदुखीवर आराम मिळतो. 

२. कच्चा बटाट्याच्या रसात फायबर भरपूर प्रमाणात असते. बटाट्याचा रस डिटॉक्सफायिंग एजन्ट म्हणून काम करतो. त्याचबरोबर किडनी, पित्ताशय व यकृताचे कार्य सुधारते. या रसात कोलेस्ट्रॉल नसतात. याउलट शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकून पेशींना होणारा रक्तप्रवाह सुधारतो.

३. ग्लासभर बटाट्याचा रस प्यायल्याने आरोग्यदायी राहण्यास मदत होते. तसेच इन्फेकशनला प्रतिबंध होतो. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने इम्युनिटी वाढीस लागते.

४. बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते, त्वचेतील घाण निघून जाते. eczema झालेल्यांसाठी हा रस अत्यंत गुणकारी आहे. १०-१५ दिवस बटाट्याचा रस घेतल्याने नक्कीच आराम मिळेल.

५. जर तुम्हाला गाऊटचा त्रास असेल तर त्यामुळे पायांच्या बोटात व सांध्यात युरिक असिडचे खडे जमा होतात. यासाठी दिवसातून दोनदा बटाट्याचा रस घ्या. किडनीच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरात युरिक असिडचे प्रमाण वाढते. बटाट्याच्या रसामुळे युरिक असिड शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. आणि किडनीचे कार्य सुधारते.

६. अपचन किंवा असिडिटी झाल्यास बटाट्याचा रस प्या. १-२ चमचे बटाट्याचा रस पाण्यात मिसळा व नाश्ता आणि दोन वेळेच्या जेवणाआधी घ्या. असे १-२ आठवडे नियमित करा. gastritis, bloating आणि पोटाच्या इतर विकारांसाठी अतिशय परिणामकारक असा नैसर्गिक उपाय आहे.

७. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी महागडे, ब्रँडेड शाम्पू वापरण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय करून बघा. बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. २० मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील. तसंच कोंड्याची समस्याही दूर होईल.

८. डोळ्यांखाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बनवलेल्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा. असे रोज केल्यास सूज व काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.