मुंबई : सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही. आपल्या केसांच्या आरोग्यावरही त्वचेचे आरोग्य अनेकदा अवलंबून असते. त्वचेइतकेच केसांची काळजी घेणेही आवश्यक आहे.
प्रदूषण, धूळ, धूर यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. यामुळे केस कमजोर, निस्तेज, शुष्क होतात. परिणामी केसगळतीचा त्रास वाढतो. मग केसांचे आरोग्य सुधारायचे असेल तर लिंबाचा वापर करणं फायदेशीर ठरते. लिंबू केस आणि टाळूसाठी फायदेशीर आहे. टाळूवरील डेड सेल्स नष्ट करण्यासाठी लिंबाचा फायदा होतो.
चमचाभर लिंबाचा रस, 2 चमचे मध, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर 30 मिनिटं लावा. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्याने केसांना त्याचा फायदा होतो.
चमचाभर लिंबाचा रस समप्रमाणात नारळाच्या तेलासोबत मिसळा. हे मिश्रण 20 मिनिटं टाळूवर लावा. त्यानंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
चमचाभर लिंबाचा रस आणि व्हिनेगर एकत्र करा. 15-20 मिनिटं केसांना आणि टाळूवर लावा. त्यानंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ करावेत. हा उपाय आठवडाभर केल्याने टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते.
लिंबू टाळूवर आणि केसांवर लावा. 10-15 मिनिटांनंतर माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
चमचाभर लिंबाचा रस आणि 2 चमचे कोरफडीचा गर एकत्र करा. केसांना आणि टाळूला नियमित हे मिश्रण लावावे. 5 मिनिटं मसाज केल्यानंतर 30 मिनिटांनी केस माईल्ड शाम्पूने स्वच्छ धुवावेत.