मुंबई : इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करणं आरोग्यदायी पर्याय आहे.
इडली प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश करून बनवली जाते. त्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच कार्बोहायड्रेट्सचा त्यामध्ये मुबलक साठा आहे.
इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक हेल्दी पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये सुमारे 40 कॅलरीज असतात.
रक्तदाबाच्या रुग्णांसाठी इडली हा उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण अत्यल्प असते. एका इडलीमध्ये सुमारे 65 मिली ग्रॅम सोडियम आढळते. म्हणूनच रक्तदाब आणि हृद्यविकाराच्या रूग्णांसाठी ते फायदेशीर आहे. रक्तदाबाच्या रूग्णांसोबतच ह्रद्यविकाराचे रूग्णही त्याचा आहारात समावेश करू शकता.
उडीद डाळीमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात इडली फायदेशीर ठरते.
उडीद डाळ,
तांंदूळ,
मूठभर पोहे
चवीनुसार मीठ
आवश्यक असल्यास ग्रिसिंगला तेल
इडली स्टॅन्ड
कृती - :
4-5 तास तांदूळ आणि उडीद डाळ भिजत ठेवा.
भिजवलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटा.
या मिश्रणामध्येच पोहेही वाटा.
सारे मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.
सकाळी सारे मिश्रण नीट ढवळून त्यामध्ये मीठ मिसळा.
आंबून तयार झालेले इडलीचे पीठ साच्यामध्ये टाका.
स्टॅन्ड कूकरमध्ये लावून 15 मिनिटं वाफवा.
गरमा गरम इडली सांबार किंवा खोबर्याच्या चटणीसोबत खावी.