... म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस मासे खायलाच हवेत !

आठवड्याचे काही ठराविक वार म्हटले की मांसाहार हवाच असा काही जणांचा नियम असतो. केवळ जीभेचे चोचले म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही मांसाहार फायदेशीर आहे. 

Updated: Apr 8, 2018, 12:00 PM IST
... म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस मासे  खायलाच हवेत !  title=

मुंबई : आठवड्याचे काही ठराविक वार म्हटले की मांसाहार हवाच असा काही जणांचा नियम असतो. केवळ जीभेचे चोचले म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही मांसाहार फायदेशीर आहे. 

मांसाहार आरोग्यदायी - संशोधकांचा दावा 

 युनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनॅलॅंडच्या संशोधकानुसार आठवड्यातून 3-4 वेळेस माशांचा आहारात समावेश केल्यास चांगल्या कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण उत्ताम राहते. हृद्यविकाराचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते. माशांमधून शरीराला ओमेगा3 फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते. नक्की वाचा - उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?

 
 डोळ्यांचे आरोग्य सुधारते - 

 माशांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होण्यास मदत होतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते. 

 
 मधूमेहींना फायदेशीर - 

माशांचा आहारात 'हेल्दी'मार्गाने समावेश केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. माशांमुळे ग्ल्युकोजचे कॉन्सनट्रेशन होण्याची प्रकिया मंदावते. शरीरात इन्सुलिनची निर्मीती होण्याची प्रक्रिया सुधारते. 

डिमेंशिया / अल्झायमरचा त्रास कमी होतो - 

आठवड्यातून दोनदा माश्यांचा आहारात समावेश केल्यास डिमेंशिया किंवा अल्झायमर या आजाराचा धोका कमी होतो.  

नैराश्य कमी होते  - 

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड नैराश्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. ज्यांच्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅट्स मुबलक असतात त्यांच्यामध्ये 30 % नैराश्याची लक्षणं कमी दिसतात.

दाहशामक - 

पॉलीअनसॅच्युरेटेड आणि ओमेगा 3 फॅट्स यामुळे यामुळे शरीरात दाह होण्याची समस्या आटोक्यात राहते. संधीवाताच्या समस्या कमी करण्यास मदत होते.