कच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे...

आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच. 

Updated: May 12, 2018, 08:34 AM IST
कच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे... title=

मुंबई : आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच. कांदा डोळ्यांना झोंबत असला तरी अत्यंत आरोग्यदायी आहे. त्यासाठी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करा. कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे...

  • कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने केस लांबसडक होण्यास मदत होते. त्याचबरोबर कांद्याचा रस स्कॉल्फला लावा आणि तासाभरानंतर कोमट पाण्याने केस धुवा. 
  • काद्यांतील पोषकतत्त्व कन्सर सारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करतात. त्याचबरोबर त्वचा विकार दूर होण्यास मदत होते.
  • रक्तदाब असणाऱ्यांसाठी कांदा एक वरदान आहे. यामुळे बीपी नियंत्रित राहतो. त्यामुळे जेवताना कच्चा कांदा जरुर खा. 
  • कच्चा कांद्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
  • स्टोन असणाऱ्यांसाठी कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. त्यासाठी रोज रिकाम्या पोटी कांद्याचा रस घ्या.
  • केसगळती ही आजकालची सामान्य समस्या आहे. पण याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. कच्चा कांद्याचा रस केसांना लावल्यास केसगळती दूर होते.
  • कांद्यात फास्फोरिक अॅसिड असते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नसांचे दुखणे असल्यास दुखत असलेल्या ठिकाणी कांद्याच्या रसाने मालिश करा. असे महिनाभर केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल.