रात्री झोपण्यापूर्वी आंंघोळीचे आरोग्यदायी फायदे !

उन्हाळ्यात घामामुळे होणारी ओथंबलेलं शरीर आणि दुर्गंधीमुळे अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात. 

Updated: Jul 11, 2018, 09:29 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी आंंघोळीचे आरोग्यदायी फायदे !  title=

मुंबई : उन्हाळ्यात घामामुळे होणारी ओथंबलेलं शरीर आणि दुर्गंधीमुळे अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात. मात्र ही सवय तुम्ही नेहमीसाठी अंमलात आणू शकता. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं ही एक चांगली सवय आहे. यामुळे शरीर  स्वच्छ राहते सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत.  

का कराल रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ ? 

तुम्हांला ताप असल्यास, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे घाम येतो आणि शरीर लवकर थंड होतं.  

तुमची दिवसभर खूप धावपळ झाली असेल, रात्री नीट झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात आवडीनुसार इसेन्शियल ऑईलचे काही थेंब मिसळून आंघोळ करा. यामुळे शरीरातील ताण हलका होण्यास आणि शांत झोप येण्यास मदत होईल.  मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात अनेक आजारांशी सामना करण्याची क्षमता वाढते. टबबाथमध्ये 'accidental drowning' चा धोका टाळण्यासाठी ...

तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करायला विसरु नका. या उपायामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. वजनदेखील झपाट्याने कमी होते.