'या' झाडांची पाने खूपच गुणकारी, कोलेस्ट्रॉल ते हाय युरिक अ‍ॅसिड झटक्यात कमी होईल

Cholesterol Home Remedies: पेरु हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. पण तुम्हाला माहितीये का पेरुच्या पानांचेही खूप फायदे आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 17, 2024, 05:12 PM IST
'या' झाडांची पाने खूपच गुणकारी, कोलेस्ट्रॉल ते हाय युरिक अ‍ॅसिड झटक्यात कमी होईल title=
health benefits in marathi Benefits Of Guava Leaves In High Uric Acid Control

Cholesterol Home Remedies: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले तर अनेक हृदयविकाराच्या समस्या निर्माण होतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मग डॉक्टर अनेक उपाय सांगतात. तसंच, अनेक पथ्य सांभाळावे लागतात. पण कोलेस्ट्रॉल व अन्य आजारांवर आयुर्वेदातही उपाय सांगितले आहेत. या झाडांची पाने हाय कोलेस्ट्रॉल सह हाय युरिक अॅसिडवर ही रामबाण उपाय आहेत. आरोग्यासाठी या झाडांची पाने खूपच गुणकारी आहेत. जाणून घेऊया त्याचा वापर आणि फायदे. 

पेरु हा आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण या फळाची पानेदेखील खूप गुणकारी आहेत. पेरुच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते. पेरुप्रमाणेच याच्या पानांमध्येही फायबरचा स्त्रोत अधिक असतो. या पानांमध्ये अँटी ऑक्सीडेंट्सदेखील आढळतात. तसंच, यात फ्लेवेनॉइड्सची मात्रादेखील अधिक असते. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय युरिक अॅसीडची समस्या असल्यास पेरुच्या पानांचे सेवन केले जातात.

पेरुच्या पानांचे सेवन कसे कराल?

पेरुच्या पानांचे सेवन तुम्ही दोन पद्धतीने करु शकता. एक म्हणजे, तुम्ही पेरुची पाने पाण्यात उकळवून ते पाणी पिऊ शकता. तसंच, या पानांचा चहादेखील तुम्ही बनवू शकता. तसंच, पेरुची पाने तुम्ही कच्ची चावून देखील खावू शकता. 

पेरुच्या पानांचे फायदे

हाय कोलेस्ट्रॉल कमी करते. 

शरीरात साचलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलमुळं अनेक शारिरीक समस्या निर्माण होऊ शकतात. बॅड कोलेस्ट्रॉल हे मेणासारखे असून ते नसांमध्ये साचून राहते. त्यामुळं हात-पाय दुखणे, लठ्ठपणा, हृदयरोगाच्या तक्रारी, हृदयविकाराचा तीव्र धक्का अशा समस्या निर्माण होतात. पेरुच्या पानांचा चहा प्यायल्यास कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. पेरुची पाने पाण्यात उकळवून ती चहाप्रमाणे पिऊ शकतात. 

वजन कमी करण्यासाठी 

वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी पेरुची पाने खाऊ शकतात. पेरुच्या पानांचा चहा प्यायल्यास चरबी झरझर वितळते. पेरुत असलेले कॉम्प्लेक्स कार्ब्स शुगरमध्ये रुपांतर करण्यास थांबवते आणि वेट लॉसची प्रोसेस लवकर सुरु करतात. 

युरिक अॅसिडसाठी फायदेशीर

युरिक अॅसिडमुळं सांधेदुखीची समस्या निर्माण होते. तसंच, पाय सुजण्यासही सुरुवात होतात. अशात पेरुची पाने युरिक अॅसिड कमी होण्यास मदत करतात. पेरुचे पाने शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. यामुळं घाणेरडे युरिक अॅसिड कमी होते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

व्हिटॅमिन सीने युक्त असलेले पेरुची पाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या सेवनाने आजारांचा धोका कमी होतो. वारंवार आजारी पडत नाहीत. या पानांचा चहा बनवण्याऐवजी चटणी बनवून खाऊ शकतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)