Cholesterol, High Blood Pressure नियंत्रणात ठेवायचंय? 'हा' पदार्थ अनेक आजारांवर रामबाण

health benefit of Kabuli chana: हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल खाण्याची इच्छा होते.  अनेकांचे तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नामध्ये काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो. पण हाच पदार्थ अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 22, 2023, 05:30 PM IST
Cholesterol, High Blood Pressure नियंत्रणात ठेवायचंय? 'हा' पदार्थ अनेक आजारांवर रामबाण title=
health benefits Eating Kabuli chana

health benefit of Kabuli chana in Marathi: आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर चांगले किंवा वाईट परिणाम होत असतो.  त्यामुळे बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आहारात चांगले बदल करण्याचा ही प्रयत्न करतो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढल्याने हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. ही समस्या थांबवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये चांगले बदल करुन तुम्ही कोलेस्ट्रॉल (Cholesterol) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात ठेवू शकता. 

जसे की चविष्ट छोले म्हणजेच काबुली चण्यांचा तुम्ही समावेश करु शकता.  हे फक्त खाण्यासाठीच चविष्ट नसतात तर ते शरीरासाठी पौष्टिक ठरतात. काबुली चणे, प्रोटिनचे सर्वात उत्तम साधन आहेत. यामध्ये दुसऱ्या डाळींच्या तुलनेमध्ये 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन असते. त्याचबरोबर अनेक शरीराच्या समस्यांपासून बचाव करण्याचे ही उत्तम काम करते. 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

काबुली चणे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते. तसेच आतड्यांमधील पित्तासोबत एकत्र होऊन रक्ताची वाढता कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हृदयाच्या समस्या कमी होते.

वाचा: तुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...

ब्लड प्रेस नियंत्रण ठेवण्यासाठी

हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करणाऱ्या रूग्णांसाठी चणे खाण अत्यंत फायदेशीर ठरतं. चन्यामध्ये असलेले पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम शरीरातील ब्लड प्रशर कंट्रोल करण्यासाठी मदत करणे. 

पाचन शक्ती विकासासाठी

चणे पचनसंस्था आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करणे. चण्यामध्ये फीटो न्यूट्रिएंट, उच्च प्रोटिन्स, मिल्स आणि व्हिटायटॅमिन पॉझिटिनर भरपूर प्रमाणात असते. जे बंधनकोष्ट, ऍसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून काम करणे 

स्नायू बळकट करण्यासाठी

जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबुली अत्यंत फायदेशीर ठरते. हे प्रोटिनचे मुख्य स्त्रोत आहेत. यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. काबुली चणे सलाडमध्ये एकत्र खाल्ल्याने शरीराला पौष्टिक आहार लाभ होतो.

वजन कमी करण्यासाठी

काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहेत. भूक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जेवणात्या फार वेळानंतर एनर्जी लेव्हल हाय ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे तुमचं वजन घटवण्यास मदत करते. तसेच मोड आलेले काबुली चणे खाणेही फायदा होतो.  

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)