मुंबई : मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर प्रामुख्याने केला जातोय. मात्र या तमालपत्राचा मसाल्यांव्यतिरिक्तही आणखी फायदा होतोय. यात अनेक औषधी गुण असतात. तमालपत्राचे सेवन केल्याने पचनासंबंधित विकार दूर होतात.
थकवा जाणवत असल्यास
थकवा जाणवत असल्यास तमालपत्राचे पान जाळल्याने थकवा दूर होतो., याच्या सुगंधाने शांती मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो
तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता, अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तमालपत्र फायदेशीर ठरते.
दातांचा पिवळेपणा कमी होतो.
तमालपत्राच्या पानांचे चूर्ण करुन त्यात संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाने ब्रश करावे. यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो.
डायबिटीजमध्ये फायदेशीर
डायबिटीजचा त्रास असल्यास तमालपत्राचे सेवन नियमित करा. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.
किडनीच्या समस्येवर फायदेशीर
किडनीच्या समस्या असल्यास त्यावर तमालपत्र फायदेशीर ठरते. किडनीशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास तमालपत्र पाण्यात टाकून ते पाणी प्या. या पाण्यात कॅन्सरशी लढणारे गुण आढळतात.
दुखण्यावर आराम मिळतो
तमालपत्राचे तेल शरीराचा जो भाग दुखत असेल त्या भागावर लावल्यास त्रास कमी होतो.