मुंबई : सध्या लग्नसराईचा काळ आहे. एप्रिल - मे महिन्यामध्ये अनेकांना एकाच आठवड्यात 4-5 लग्नाची आमंत्रण मिळाली असतील. आजकाल लग्नसोहळे, पार्टीमध्ये किंवा काही रेस्ट्रॉरंटमध्येही बुफे पद्धतीत जेवणाची सोय केली जाते. कमी वेळात अधिक माणसं जेऊ शकतात. हा बुफे पद्धतीचा फायदा असला तरीही अशा पद्धतीमध्ये जेवणं शरीराला फारसे लाभदायक नाही. म्हणूनच तुम्ही बुफे पद्धतीमध्ये जेवण्याआधी जाणून घ्या आहारतज्ञांनी दिलेला खास सल्ला.
स्टार्टस आणि वेलकम ड्रिंक हे भरपूर कॅलरीयुक्त असतात. त्यामुळे अशा अनहेल्दी पदार्थांची चव चाखल्यानंतर जेवणाचे सारे पाणी होते. आरोग्याला त्याचा फायदा होत नाही.
उभ्या स्थितीत जेवणे किंवा पाणी पिणे हे चुकीचे आहे. जमिनीवर बसून जेवण्याची सवय सहाजिकच पोटावर एक विशिष्ट दाब निर्माण करते. तो दाब उभं राहून खाण्यात नसल्याने नेमकी पोटाची गरज किती हेच कळत नाही.उभं राहून पाणी पिता मग 'या' 7 गोष्टी जरूर वाचा
उभं राहून खाणं खाणं दमवणारे असल्याने अनेकजण ताटातलं अन्न पटापट संपवतात परिणामी ते नीट चावले जात नाही. परिणामी पचनकार्यात बिघाड होण्याची शक्यता असते.
बुफे पद्धतीमध्ये पुन्हा पुन्हा जेवणाच्या काऊंटरवर येण्यापेक्षा एकाचवेळी भरपूर अन्न घेतले जाते. त्यामुळे अन्न वाया जाऊ नये या भावनेतून गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाते. बुफे पद्धतीमध्ये खूप प्रकारचे अन्नपदार्थ ठेवण्याचा ट्रेन्ड आहे. त्यामुळे जेवणाशिवाय तळकट, चायनिज, सोडा घातलेले अन्न अधिक असते. त्याचे सेवन धोकादायक ठरू शकते.
बुफे पद्धतीमध्ये जेवणाच्या अनेक पदार्थांसोबतच गोडाच्या पदार्थांचेदेखील अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे भरपेट जेवणानंतर गोडाच्या पदार्थांवर ताव मारणं त्रासदायक ठरू शकते.जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?