विशीतील तरूण वापरत नाहीत कंडोम, सरकारने सुरू केली मोहीम

 हा प्रकार पुढे येताच सरकारही खडबडून झाले झाले आहे. आणि सरकारने जागृकता घडविण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.

Updated: Nov 15, 2018, 01:14 AM IST
विशीतील तरूण वापरत नाहीत कंडोम, सरकारने सुरू केली मोहीम title=

लंडन : 'सोळावं वरीस धोक्याचं', ही म्हण आपल्याकडे फार जूनी आहे. ही म्हण व्याप्त स्वरूपात वापरली जाते. कारण या वयात तरूण-तरूणी अनेक चुका करतात. इंग्लंडमध्येही असाच धक्कादाक खुलासा एका सर्व्हेदरम्यान पुढे आला आहे. हा प्रकार पुढे येताच सरकारही खडबडून झाले झाले आहे. आणि सरकारने जागृकता घडविण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे. ही मोहिम आहे कंडोम वापरण्याबाबत. सर्वेत पुढे आले आहे की, इंग्लंडमधले 16 ते 25 या वयोगटातील बहुतांश तरूण-तरूणी शरीरसंबंध ठेवताना कंडोम वापरत नाहीत.

सरकारने सुरू केली मोहीम..

कंडोम न वापरण्याच्या सवयीमुळे अनेक तरूणांना लैंगिक आजारांनी त्रस्त केले आहे. तसेच, असुरक्षित (कंडोम न वापरता) केलेल्या लैंगिक देवान-घेवाणीमुळे या आजारांच्या संक्रमनाचाही धोका वाढत आहे. ही बाब जेव्हा सरकारच्या ध्यानात आली तेव्हा सरकार खडबडून जागे झाले. सरकारने तरूणांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत तरूणांना लैंगिक आजार, त्यापासून वाचण्याचे उपाय तसेच, सुरक्षित लैंगिक संबंध कसे ठेवावेत याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी कंडोम वापरणे किती महत्त्वाचे आहे, याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

इग्लंडचे आरोग्य मंत्रालयही झाले चकीत...

16 ते 24 या वयोगटातील तरूण लैंगिंक संबंधांवळी कंडोम वापरत नाहीत. आणि अशा तरूणांची संख्या मोठी आहे, हे लक्षात येताच इंग्लंडचे आरोग्य मंत्रालय अवाक झाले. इतकी मोठी गोष्ट सरकारला कशी कळली नाही, याबाबत चर्चाही झाली. सर्व्हेतून ही बाब पुढे आली होती. यानंतर आरोग्य मंत्रालयाने एक मोहीमच सुरू केली. ज्याद्वारे कंडोम वापराचे फायदे सांगण्यात येत आहेत.

कंडोम न वापरण्याची कारणे

दरम्यान, सर्व्हेमध्ये अनेक तरूण तरूणींना प्रश्न विचारण्यात आले की, कंडोम न वापरण्याचे कारण काय? यावर अनेक तरूण तरूणींनी मत व्यक्त केले. अनेकांनी प्रतिक्रिया दिली की, कंडोम न लावता शरीरसंबंध ठेवण्यास अधिक मजा येते. अनेक तरूण मोठ्या कौतूकाने सांगतात की, आपण अनेक तरूणींसोबत कंडोम न वापरता शरीरसंबंध केले आहेत. काही तरूणांनी म्हटले आहे की, शरीरसंबंध सुरू असताना आम्ही नशेत असतो. अनेकदा आम्ही मद्यसेवन केलेले असते. त्यामुळे आम्हाला कंडोम वापरण्याचे भानच राहात नाही. काही म्हणतात, कंडोम वापरण्याने काय फरक पडतो. आम्ही निरोगी आहोत. तर, काही मंडळी सांगतात आम्ही गर्भनिरोधक औषधं घोतो. मग, कंडोम कशाला वापरायला पाहिजे.