पान, सुपारी खातायं ? सावधान !

 तंबाखू हे जसे कॅन्सरचे कारण होते त्याप्रमाणे पान-सुपारीतूनही कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असा दावा करण्यात आला आहे. 

Updated: Dec 19, 2017, 01:47 PM IST
पान, सुपारी खातायं ?  सावधान !  title=

मुंबई : 'मला तंबाखूचे व्यसन नाही,मी फक्त पान-सुपारी खातो', असे म्हणणारे आपल्या आजूबाजूला अनेकजण असतात.

पण या पान- सुपारी प्रेमींसाठी वाईट बातमी आहे. तंबाखू हे जसे कॅन्सरचे कारण होते त्याप्रमाणे पान-सुपारीतूनही कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असा दावा करण्यात आला आहे. 

कोणी केलाय दावा

'लान्सेट' या मासिकाच्या डिसेंबरमधील अंकात यासंदर्भात लेख देण्यात आला आहे. 'ऑनकोलॉजी' या सदरात पान आणि सुपारीसारख्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे तोंडाचा , अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो असे लिहिले आहे.

दाव्याला दुजोरा 

 नोएडातील राष्ट्रीय कॅन्सर रोखथाम व अनुसंधान संस्थेचे (एनआईसीपीआर) संचालक प्राध्यापक रवि मेहरोत्रा यांनी  'लान्सेट' च्या दाव्यास दुजोरा दिला आहे. 

काय होतो त्रास ?

सुपारी व मसाला टाकलेले पान किंवा फक्त सुपारी असलेल पानं खाण्याची अनेकांना सवय असते.

पण हे खाणे आपल्या जिवावर बेतू शकते. यामूळे हृदय, पोट,आतडे, चयापचय क्रियेबरोबरच श्वसनाशी संबंधित त्रास होत असल्याचे म्हटले गेले आहे.  

त्यामूळे पान-सुपारी खाणाऱ्यांना वेळेत सावधान करणे गरजेचे आहे.